अकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:58 IST2021-01-08T04:58:16+5:302021-01-08T04:58:16+5:30

शहरातील लक्कडगंज येथील पत्रकार प्रेमरतन व्यास सभागृहात अकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय ...

Akot Taluka Press Association celebrates Press Day | अकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

अकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

शहरातील लक्कडगंज येथील पत्रकार प्रेमरतन व्यास सभागृहात अकोट तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न जिल्हा पत्रकार संघाचे अंतर्गत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिओम व्यास होते. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कीर्तीकुमार वर्मा, जिल्हा सचिव विजय शिंदे, ज्येष्ठ पत्रकार दीपक देव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कीर्तीकुमार वर्मा यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्याच कार्यक्रमाला किरण भडंग, रमेश तेलगोटे, लक्ष्मीकांत व्यास, लकी इंगळे, संतोष विणके, हरिदास चेडे, विनोद कोनप्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन तालुका पत्रकार संघाचे सचिव मंगेश लोणकर तर आभार वसीम खान यांनी मानले. (फोटो)

Web Title: Akot Taluka Press Association celebrates Press Day