शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आकोट तालुक्यात वादळाच्या तडाख्याने फळबागा भुईसपाट

By admin | Updated: October 30, 2015 01:43 IST

आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान.

आकोट : आधीच दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करीत असलेल्या शेतकर्‍यांना २८ ऑक्टोबरच्या रात्री वादळ-वार्‍याचा तडाखा बसला. आकोट तालुक्यातील अकोली जहॉगीरसह बागायती क्षेत्रातील फळबागाचे नुकसान झाले आहे. केळी व संत्रा मातीमोल झाला असून पर्‍हाटी व ज्वारीची पिके वार्‍याच्या वेगामुळे वाकली आहेत. लाखो रुपयांचे नैसर्गिक नुकसान झाले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या नुकसानीचा पाहणी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात हजारो हेक्टर क्षेत्रात संत्रा व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये बहरलेला कोट्यवधी रुपये किंमतीचा संत्रा वादळामुळे जमिनीवर गळून पडला, अनेक झाडे मोडून पडलीत. बोंड्याने लदबदलेली पर्‍हाटीची झाडे व ज्वारीचे पीक झोपल्याने मातीमोल झाले आहे. अकोली जहॉ., रुईखेड या भागातील केळी संत्रा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात जवळपास २00 ते ३00 हेक्टरच्या वर नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. काही झाडे पडली, केळीचे घड जमीनदोस्त झाले आहेत. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अकोली जहॉगीर, राजुरा, अंबाडी, कपाशी या शेतशिवारात पाहणी केली. या चार शेतशिवारात प्राथमिक अंदाजानुसार ३५ हेक्टर केळी, तर ५५ हेक्टर संत्रा बागांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.आधीच नापिकी व अनियमित पर्जन्यमानाचा फटका पिकांना सहन करावा लागत आहे. खरीप हंगामात शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फळबागाकडे लक्ष दिले होते. परंतु, वादळाचा तडाखा फळबागांना बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. यापूर्वी १0 फेब्रुवारीच्या वादळी पावसामुळे आकोट तालुक्यात ७८0 हेक्टर केळीचे पीक व ८४0 हेक्टर संत्रा पिकाची नासाडी झाली होती.