शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात होणार लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

By admin | Updated: January 7, 2015 01:34 IST

बाल विकास मंचच्या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रथमच भव्य प्रमाणात आयोजन.

अकोला : क्रिकेटच्या मैदानातील फलंदाजांची फटकेबाजी आणि गोलदांजांची गुगली अनुभवणे कोणाला आवडणार नाही? हा अनुभव आपण टीव्हीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्‍यात सुरू असलेल्या सामान्यांमधून घेत असतो. क्रिकेटच्या मैदानात उतरून प्रत्यक्ष बॅट हातात घेऊन फटकेबाजी करणे आणि बॉल टाकून समोरच्याची गुगली घेणे हा अनुभव कसा वाटेल हो! हा अनुभव घेण्याची इच्छा ह्यलोकमतह्ण पूर्ण करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी आतंरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनामुळे अकोलेकरांना शालेय क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे. नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर्स अँन्ड डेकोरेशन प्रस्तुत लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा-२0१५ ला बुधवार, २१ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होणार आहे. अकोला शहरात प्रथमच शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असल्याने अकोला क्रिकेट क्षेत्रात नवचैतन्य पसरले आहे. शालेय विद्यार्थ्यांंमधील क्रीडानैपुण्य वृद्धिंगत व्हावे, या दृष्टीने अकोला क्रिकेट क्लब अकोला, पॅरामाउंट स्पोर्ट्स, सहयोग फायनान्शियल मॅनेजमेंट सर्व्हिस लि. यांच्या सहकार्याने स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा २१ ते ३0 जानेवारी या कालावधीत होत असून, १२ षटकांचे सामने हे बाद पद्धतीने होतील. १६ वर्षांखालील गटात खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांचा प्रवेश विद्यालयामार्फत स्वीकारण्यात येईल. दहा दिवस चालणार्‍या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट होणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर अशा वैयक्तिक पुरस्कारांसह विजेत्या आणि उपविजेत्या संघाला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. स्पर्धेत र्मयादित शालेय संघांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी लोकमतने नवोदित क्रिकेटपटूंना आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेच्या माध्यमातूनएक संधी उपलब्ध करून दिली असून या माध्यमातून क्रीडानैपुण्याला निश्‍चितच वाव मिळेल, असे सांगीतले.