शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

अकोल्यात शेतकर्‍यांचा पोलीस मुख्यालयी रात्रभर ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:45 AM

‘कासोधा’ परिषदेच्या नंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलनाची हाक दिली.  सोमवारी दुपारी गांधी जवाहर बागेतील आंदोलनाला सुरुवात केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान  सिन्हा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व २00 च्या वर शेतकर्‍यांना  अटक करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे प्रशासनाने नमते घेत ५  मागण्या मान्य करीत असल्याचे लेखी पत्र दिले. मात्र, ते अमान्य करीत सिन्हा यांनी पोलीस मु ख्यालयातच रात्र काढण्याचा पवित्रा घेतला व शेकडो शेतकर्‍यांसह आंदोलन सुरुच ठेवले. या  प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. 

ठळक मुद्देशेतकरी जागर मंचच्या आंदोलनाने घेतले आक्रमक स्वरूप रात्री उशिरापर्यंत प्रशासनासोबत चर्चा 

‘कासोधा’ परिषदेच्या नंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी आंदोलनाची हाक दिली.  सोमवारी दुपारी गांधी जवाहर बागेतील आंदोलनाला सुरुवात केली. संध्याकाळी ५ च्या दरम्यान  सिन्हा यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व २00 च्या वर शेतकर्‍यांना  अटक करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यामुळे प्रशासनाने नमते घेत ५  मागण्या मान्य करीत असल्याचे लेखी पत्र दिले. मात्र, ते अमान्य करीत सिन्हा यांनी पोलीस मु ख्यालयातच रात्र काढण्याचा पवित्रा घेतला व शेकडो शेतकर्‍यांसह आंदोलन सुरुच ठेवले. या  प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  पोलिसांनी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास यशवंत सिन्हा, शेतकरी नेते रविकांत  तुपकर, प्रशांत गावंडे, जगदीश मुरूमकार, ज्ञानेश्‍वर सुलताने, विजय देशमुख, सम्राट डोंगरदिवे  यांच्यासह २५0 शेतकर्‍यांना ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात आणले. कोणत्या कायद्याखाली  आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले, असा सवाल यशवंत सिन्हा यांनी जिल्हा प्रशासनाला करून,  पोलीस मुख्यालयात रात्रभर ठिय्या देण्याचा निर्णय घेतल्याने, जिल्हाधिकारी व पोलीस  अधीक्षकांची चांगलीच कोंडी झाली. शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस मुख्यालयात आणले. यावेळी यशवंत सिन्हा  यांनी, शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना, पोलिसांनी कोणत्या कायद्यांतर्गत शे तकर्‍यांना ताब्यात घेतले, असा प्रश्न पोलिसांना केला; परंतु पोलीस निरूत्तर झाले. रात्री ९ वाज ताच्या सुमारास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे  पोलीस मुख्यालयात आल्यावर, त्यांनी यशवंत सिन्हा यांच्याकडे जात, आम्ही तुम्हाला अटक  केलेली नाही. त्यामुळे तुम्ही सर्व शेतकरी घरी जाऊ शकता, असे स्पष्ट केले. त्यावर यशवंत  सिन्हा, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे यांनी शेतकरी स्वमर्जीने येथे आले नाहीत. तुम्हीच  आम्हाला ताब्यात घेतले आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून हलणार  नाही, असा इशारा दिला. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाची चांगलीच गोची झाली. यशवंत सिन्हा व शेतकरी येथून जायला तयार नसल्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न  जिल्हाधिकार्‍यांना पडला. 

बोरगाव मंजू व कुरणखेड येथे रास्ता रोको बोरगाव मंजू : माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचेसह शेतकर्‍यांना केलेल्या अटकेचा  निषेध करीत शेतकर्‍यांनी कुरणखेड आणि बोरगाव मंजू येथे रास्ता रोको आंदोलन केले. बोरगाव  मंजू पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळानंतर सोडून दिले.  बोरगावात  संजय  वानखडे भाऊराव वानखडे, समीउलाह शहा, सुनील इंगळे, संजय निलखन, सखाराम वानखडे,  प्रल्हाद वैराळे, तेजराव भातकुले, पूर्णाजी ढवळे, प्रमोद सिरसाट, संदीप तायडे, मनोहर सिरसाट,  आदी आंदोलनकर्त्यांना अटक केली तर कुरणखेड येथे अ.भा. छावा संघटनेचे योगेश  विजयकर, कुणाल राठोड आदींच्या नेतृत्वात रास्तारोको करण्यात आला. 

भारिप-बमसं आज करणार रास्ता रोकोशेतकरी जागर मंचाने ठिय्या आंदोलन दिल्यानंतर नेतृत्व करणारे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा  यांना पोलिसांनी अटक केली. हा प्रकार म्हणजे, शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे.  शासनाकडून सुरू असलेली गळचेपी सहन केली जाणार नाही, असे सांगत भारिप-बमसंकडून  त्याचा निषेध करण्यासाठी उद्या मंगळवारी रास्ता रोको करण्याचे आदेश पक्षाचे नेते अँड. प्रकाश  आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

शिवसेनेचा नेहरु पार्कजवळ रास्ता रोकोशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी नेहरु पार्क चौकात रास्ता  रोको करुन शेतकरी जागर मंचच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य  करुन सोडून देण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली. तर आमदार गोपीकिसन बाजोरिया यांनी  पोलीस मुख्यालयात यशवंत सिन्हा यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. 

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरच सिन्हा यांनी घेतली विश्रांती!शेतकर्‍यांच्या सर्जिकल स्ट्राइक आंदोलनात ८३ वर्षांचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा  हिरीरीने सहभागी झाले. आंदोलनातील दिवसभराच्या दगदगीमुळे थकलेल्या यशवंत सिन्हा यांनी  रात्री ९ वाजता पोलीस मुख्यालयातील मैदानावरील झाडाखालीच काहीवेळ झोप घेतली. परंतु,  शेतकर्‍यांचा उत्साह पाहून ते उठले आणि वेळोवेळी त्यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोबाइलवरून केली चर्चाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मोबाइलवरून माजी केंद्रीय मंत्री यशवंत  सिन्हा यांच्यासोबत चर्चा करून, तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून, शेतकर्‍यांच्या  सर्जिकल स्ट्राइकमध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील, असे स्पष्ट केले. 

रविकांत तुपकर यांची सिन्हा यांच्यासोबत चर्चाशेतकर्‍यांच्या सर्जिकल स्ट्राइक आंदोलनाच्या पुढील दिशेबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ने ते रवीकांत तुपकर, प्रशांत गावंडे, जगदीश मुरूमकार, कृष्णा अंधारे हे सातत्याने यशवंत सिन्हा  यांच्याशी चर्चा करीत होते. यावेळी पुढे काय करायचे, आंदोलन कशा पद्धतीने पुढे रेटायचे,  याबाबत सिन्हा त्यांना मार्गदर्शन करीत होते. 

प्रशासनाने दिलेले जेवणही नाकारले!शेतकर्‍यांचे आंदोलन रात्रभर सुरुच राहील, याचा अंदाज आल्याने प्रशासनाने सर्व आंदोलनक र्त्यांच्या जेवणाची रात्री उशिरा व्यवस्था केली होती. मात्र, प्रशासनाने केलेली ही व्यवस्था नाकारत  डॉ. अभय पाटील यांच्या माध्यमातून आलेले भोजन स्विकारणे पसंत केले. प्रशासन मागण्या  मान्य करीत नाही, तोपर्यंत आम्ही भूमिकेवर ठाम आहोत, अशी भूमिका घेतली. 

काँग्रेसने दिला पाठिंबाकाँग्रेसचे माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, माजी आमदार नातिकोद्दीन खतिब, काँग्रेसचे  शहराध्यक्ष व माजी आ. बबनराव चौधरी, रमाकांत खेतान,  प्रकाश तायडे, मनपा विरोधी पक्षनेते  साजिद खान पठाण, प्रदीप वखारिया, शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा आदी पोलीस मु ख्यालयात आले. त्यांनी यशवंत सिन्हा यांच्यासोबत चर्चा करून, या आंदोलनाला आमचा पाठिंबा  असून, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी डॉ. अभय पाटीलसुद्धा उपस्थित  होते. 

कर्जमाफीच्या मुद्यावर जिल्हाधिकारी निरुत्तर जिल्हाधिकार्‍यांनी भेटण्यासाठी बोलवावे किंवा त्यांनी चर्चेसाठी यावे, या आवाहनानुसार ठिय्या  आंदोलनात आलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शासनाने कर्जमाफी दिली आहे.  त्याचा लाभ जिल्ह्यातील ६२ हजार शेतकर्‍यांना झाल्याचे सांगितले. त्यावर उपस्थित किती शे तकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, असे विचारताच कुणीही होकार दिला नाही.  आंदोलकांसमोर शासनाची बाजू सावरताना या मुद्यावर जिल्हाधिकारी पाण्डेय निरूत्तर झाले.  त्यामुळे किमान जिल्हाधिकार्‍यांचे म्हणणे तरी ऐकून घ्या, असे आवाहन करण्याची वेळ  आंदोलकांचे नेते माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्यावर आली.शेतकरी जागर मंचच्यावतीने मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. सात त्याने निवेदने दिली. त्यावर शासनाने काय केले, शेतकर्‍यांसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी  कधी होणार, याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. चर्चेसाठी  आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या निवेदनातील सात मागण्यांवर माहिती देण्याचा प्रयत्न  केला. जिल्ह्यातील जवळपास ६२ हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा  झाल्याचे सांगितले. त्यावर उपस्थित शेतकर्‍यांनी तत्काळ आक्षेप घेतला. उपस्थित असलेल्यांपैकी  एकाच्याही खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे प्रत्युत्तर दिले. या प्रकाराने गोंधळ वाढला. माजी  मंत्री सिन्हा यांनी जिल्हाधिकारी सांगत असलेली माहिती ऐकून घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर  जिल्हाधिकार्‍यांनी इतर मागण्या शासन स्तरावरील असल्याने तेथून निर्णय होईल, असे सांगत ते थून निघाले; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीशी असहमत आहोत, त्यामुळे आंदोलन  सुरूच राहील, असे सिन्हा यांनी सांगितले. त्यानंतर एक तासात शासनाने निर्णय घ्यावा, असे  आवाहन केले. 

या मागण्यांना शासनाचा प्रतिसादच नाही..हमीभावाने धान्य खरेदीतील नियम व अटी काढून टाकाव्या, शेतकर्‍यांचा संपूर्ण माल नाफेडने  खरेदी करावा, उत्पादनाची र्मयादा लावू नये, सर्व शेतमालासाठी तफावतीची रक्कम ‘भावांतर’  योजनेतून द्यावी,  कपाशीवरील बोंडअळी नुकसानासाठी एकरी ५0 हजार नुकसान भरपाई द्या,  व्याज व दंडासह आकारलेल्या अवाजवी वीज देयकांची वसुली थांबवावी, वीज पुरवठा तोडू  नये, पीक विमा तातडीने द्या, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे,  सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतकर्‍यांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी  असल्याने योजनेचे नाव बदलावे, तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी.

 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरीagitationआंदोलन