शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिका हद्दवाढीची बैठक लांबणीवर

By admin | Updated: January 8, 2015 00:53 IST

ग्रामपंचायतींनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास.

अकोला: महापालिका हद्दवाढीच्या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मुंबई येथे आयोजित केलेली बैठक लांबणीवर गेली. बुधवारी होणारी बैठक काही कारणामुळे होऊ शकली नाही. बैठक टळल्यामुळे शहरानजिकच्या ग्रामपंचायतींनी मात्र सुटकेचा नि:श्‍वास सोडला.शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ र्मयादित असल्यामुळे शहरातील जमिनींचे भाव प्रचंड वधारले आहेत. त्याचा परिणाम रहिवासी इमारतींच्या बांधकामावर होत आहे. मध्यमवर्गीयांसाठी शहरात जागा विकत घेऊन घर बांधणे अशक्य झाल्याचे चित्र आहे. याशिवाय शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा मनपाकडून पुरविल्या जाणार्‍या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. अकोला शहराची लोकसंख्या व भविष्यातील हद्दवाढ लक्षात घेता, मनपा प्रशासनाने २00२ मध्ये हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये शहरालगतच्या २१ गावांचा समावेश प्रस्तावित करण्यात आला होता. अधिवेशनात हद्दवाढीच्या मुद्यावर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले असता, मनपाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मनपा हद्दवाढीचे सुमारे सहा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले. अद्यापपर्यंत यावर कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यादरम्यान, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शहरासाठी स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) लागू करणे व हद्दवाढीसाठी पुढाकार घेतल्याने आशादायी चित्र निर्माण झाले. हद्दवाढीच्या मुद्यावर डॉ.पाटील यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. ६ जानेवारी रोजी आयोजित बैठक टळल्यामुळे ७ जानेवारी रोजी घेतल्या जाणार होती; परंतु काही कारणास्तव ही बैठक लांबणीवर गेली. यामुळे बरखास्तीची धाकधूक असलेल्या ग्रामपंचायतींनी मात्र सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या संदर्भात नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनपाची हद्दवाढ करण्यासाठी मुंबईत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती; परंतु इतर कामांच्या व्यस्ततेमुळे ही बैठक होऊ शकली नाही. हद्दवाढीच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले. *हद्दवाढ आवश्यकशहराचे र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता, मनपाची हद्दवाढ करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रात बांधकाम करताना व्यावसायिकांना ह्यएफएसआयह्णची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामपंचायत क्षेत्रात इमारती उभारण्याला प्राधान्य दिले आहे; परंतु ग्रामपंचायत हद्दीत लेआऊटचे निर्माण नसल्यामुळे कालांतराने मूलभूत सोयी-सुविधांच्या अडचणी निर्माण होतात. भविष्यात मनपाची हद्दवाढ झाल्यास प्रशासनासमोर ग्रामपंचायत क्षेत्रातील अवैध बांधकामाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.