शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापौर, उपमहापौर पदासाठी घोडेबाजार तेजीत

By admin | Updated: September 6, 2014 02:16 IST

भाजपचे आर्थिक गणित शिवसेनेसाठी डोईजड

अकोला : शहर विकासाची तळमळ दाखवणार्‍या विरोधी पक्ष भाजपाने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसमोर ३0 टक्के आर्थिक खर्चाचा प्रस्ताव समोर केला असून, भाजपचे गणित शिवसेनेसाठी डोईजड ठरत आहे. महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान करताना एक छदामही न घेणार्‍या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी का खर्च करावा, असा सवाल शिवसेनेच्या गोटातून उपस्थित केल्या जात आहे.महापौर पदासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार असल्याचे संकेत आहे. यादरम्यान, महापौर पदाच्या निवडणुकीला तब्बल दोन कोटी रुपये खर्च येणार असल्याने त्यामधील ३0 टक्के खर्च शिवसेनेने उचलावा, या मुद्यावरून युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महानगर सुधार समितीसह काही अपक्षांनी एकत्र येत, दहा जणांची मोट बांधली आहे. प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यासह उपमहापौर पद देण्याची मागणी या सुज्ञ व प्रामाणिक नगरसेवकांनी भाजपकडे केल्याची माहिती आहे. यासाठी काही ज्येष्ठ नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून भाजपवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. अशास्थितीत उपमहापौरपद शिवसेनेला मिळावे, याकरिता सेनेचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु उपमहापौरपद हवे असल्यास महापौर पदासाठी जो खर्च येईल, त्यामधून ३0 टक्के खर्च शिवसेनेने करावा,असा विचित्र प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती आहे. या मुद्यावरून शिवसेनेतील वातावरण तापले आहे. महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोणतीही आर्थिक मागणी केली नसताना, उपमहापौरपदासाठी ३0 टक्के खर्च का करावा, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. या मुद्यावर भाजपने तोडगा न काढल्यास वेगळा विचार करण्याचे संकेत काही नगरसेवकांनी दिले आहेत.