शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: July 15, 2015 01:34 IST

ग्रामपंचायत निवडणूक; ऑनलाइन अर्जामुळे उमेदवार संभ्रमात.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ह्यऑनलाइनह्ण उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सोमवार, १३ जुलैला सुरू झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी १६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणे व स्वीकारण्याची प्रक्रिया १३ जुलैपासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. मंगळवारी मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा ग्रामपंचायतीसाठी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच अकोला तालुक्यातील गुडधी येथे १, मलकापूर येथे ३, शिवर येथे १, शिवणी येथे ६, बोरगाव खुर्द १ असे १२ अर्ज दाखल करण्यात आले. आकोट तालुक्यात तीन अर्ज दाखल करण्यात आले. बाश्रीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व पातूर या तालुक्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. जिल्ह्यात ३८५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोंदणी केली. यामध्ये आकोट तालुक्यात ६९, अकोला १३४, बार्शिटाकळी २१, पातूर २२, तेल्हारा २८, मुर्तिजापूर १७, बाळापूर ९४ जणांनी नोंदणी केली.

           ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्जाची प्रत उमेदवारांना तहसीलदार तथा निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करावयाची आहे. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती व हमीपत्र, मालमत्ता आणि गुन्हेगारीविषयी घोषणापत्र, जातीचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, तिसरे अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शौचालय असल्याचा दाखला, पाणीपट्टी, घरपट्टी थकीत नसल्याचा दाखला इत्यादी दाखले व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र,ऑनलाइन अर्ज भरताना यातील काही प्रमाणपत्रांचा उल्लेखच नाही. त्यामुळे उमेदवार संभ्रमात आहेत. शौचालय, अपत्यप्रमाणपत्राबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अधिकार्‍यांकडून त्यासाठी उमेदवारांची अडवणूक होत असल्याचे प्रकार मंगळवारी घडले.