शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद ६१ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार!

By admin | Updated: January 6, 2015 01:40 IST

दोन वर्षांपासून योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत पडली बंद.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यात ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण अवस्थेत सोडून देण्यात आली आहे. ही अपूर्ण कामे आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात या कामांचे प्रस्ताव नव्याने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत शासन निधीतून ग्रामपंचायत स्तरावरील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे केली जातात. जिल्ह्यात गत दोन वर्षांत मंजूर २१५ पाणीपुरवठा योजनांच्या कामांपैकी १८९ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत ७0 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, ५८ पाणीपुरवठा योजनांची कामे सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहेत. तर ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली आहेत. ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून सुरू करण्यात आलेली पाणीपुरवठा योजनांची ही कामे निधी उपलब्ध असताना अपूर्ण अवस्थेतच बंद पडली आहेत. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे ६१ पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांकडून काढून जिल्हा परिषदमार्फत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे. ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांमार्फत सुरू करण्यात आलेली; मात्र अपूर्ण स्थितीत बंद पडलेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची कामे संबंधित ग्राम पाणीपुरवठा समित्यांकडून काढून घेण्यात येतील. तसेच अपूर्ण अवस्थेत बंद पडलेली ही कामे पूर्ण करण्यासाठी नव्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत प्रस्तावित करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांनी सांगीतले.