शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपाला मिळणार मुद्रांक अधिभाराचे ६५ लाख

By admin | Updated: July 24, 2014 02:07 IST

मुद्रांक अधिभाराचे १ टक्का अधिभारापोटी महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख वितरित करण्याचे आदेश.

अकोला : राज्य शासनाकडून जमा करण्यात येणार्‍या मुद्रांकांतून देण्यात येणार्‍या १ टक्का अधिभारापोटी अकोला महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख २८ हजार रुपये वितरित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने बुधवारी जारी केले आहेत. या निधीमुळे आर्थिक संकटाच्या काळातून जात असलेल्या अकोला महानगरपालिकेच्या तिजोरीतील गंगाजळी वाढण्यास मदत होणार आहे. मुद्रांक अधिभारापोटीची रक्कम राज्यातील महापालिकांना वितरित करण्यासाठी वित्त विभागाने ८00 कोटींची तरतूद केली होती.; मात्र, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यात आणखी ४९५ कोटींची वाढ करून ही रक्कम १२९५ कोटी करण्यात आली. त्यातून, २0१३-१४ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांच्या थकबाकीपोटी राज्यातील १४ महापालिकांना २0३ कोटी ३४ लाख रुपये ५ मे रोजी वितरित केले होते. आता नव्याने २५ महापालिकांना त्यांच्या गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजे जानेवारी ते मार्च २0१४ या तीन महिन्यांची २३८ कोटी थकबाकी देण्यात येणार आहे. त्यातून अकोला महापालिकेला थकबाकीचे ६५ लाख २८ हजार रुपये मिळणार आहेत. एलबीटी लागू झाल्यांनतर अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कर्मचार्‍यांचे वेतन, रखडलेली विकास कामे यासाठी निधीची तरतूद करताना अधिकार्‍यांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी मनपाचे अधिकारी धडपडत असतानाच मुद्रांक अधिभाराच्या थकबाकीची रक्कम मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.