शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहर बस वाहतूक सेवा ठप्प; सत्ताधारी सुस्त

By admin | Updated: November 24, 2014 01:31 IST

मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत.

अकोला : भंगार झालेल्या शहर बसला अपघात झाल्यास आयुक्तांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होईल, हा निर्णय धडकल्याने मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सिटी बस सेवा बंद केली. त्यानंतर मुंबई व पुणे येथील कंपनीमार्फत सिटी बस सेवा सुरू करण्याच्या प्रशासनाच्या वल्गना हवेत विरल्या असून, अकोल्यात येण्यास संबंधीत कंपन्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. शिवाय प्रशासनाने जारी केलेल्या निविदेकडेही पाठ फिरवण्यात आल्याने शहर बस वाहतुकीची समस्या आणखी वाढीस लागली आहे. या मुद्दय़ावर सत्तापक्षाची उदासीन भूमिका लक्षात घेता, अकोलेकरांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.शहर बस वाहतूक सेवेचा करार संपल्यामुळे ३ ऑगस्ट २0१४ पासून शहरातूल बस वाहतूक बंद करण्याचे पत्र बस वाहतूकदार संस्थेच्यावतीने मनपाला देण्यात आले होते. त्यावर हा करार रद्द करून नवीन गाड्यांची खरेदी करा व मनपाचे पैसे बुडवणार्‍या संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी सुनील मेश्राम, भारिपचे गजानन गवई यांनी १८ जुलै रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत केली होती. भंगार झालेल्या बसला अपघात झाल्यास आयुक्त, महापौरांविरुद्ध गुन्हे दाखल होतील, ही बाब समोर येताच बस सेवा बंद करण्याचा निर्णय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. करारात नमूद असलेल २३ पैकी अवघ्या ८ शहर बस बंद झाल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर, विद्यार्थ्यांंचे हाल होत आहेत. उपाय म्हणून उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी आठपैकी चार गाड्यांची रंगरंगोटी करून त्या रस्त्यावर आणल्या होत्या. हा प्रयोग अवघ्या आठ दिवसांतच फसला. अर्थातच, बस सेवेपासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची हमी असतानादेखील उपायुक्त चिंचोलीकरांनी सर्व गाड्या मोटार वाहन विभागात जमा केल्या. नवीन बस सेवेसाठी इच्छुकांकडून प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात निविदा सादर करीत प्रस्ताव मागवले होते. निविदेतील क्लिष्ट अर्टी व शर्ती लक्षात घेता, कोणीही निविदा सादर केली नाही. सीटी बस सेवा ठप्प पडल्यामुळे सर्वसामान्य अकोलेकरांना त्रास सहन करावा लागत आहे.