चान्नी परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय

By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-20T00:43:15+5:302014-06-20T00:44:55+5:30

अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चोर्‍या झाल्या आहेत.

Activists of thieves active in Chani area | चान्नी परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय

चान्नी परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चोर्‍या झाल्या आहेत. या परिसरात चोरट्यांची टोळीच सक्रिय असून, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आतापर्यंत झालेल्या एकाही चोरीचा तपास लागलेला नाही.
चान्नी परिसरातील चतारी, विवरा, दिग्रस बु., खेट्री व चान्नी या गावांमध्ये गत महिनाभरात चोर्‍या झाल्या. अज्ञात चोरट्यांनी सोने व चांदीच्या दागिण्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. आतापर्यंत मात्र एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गत काही दिवसांपूर्वी खेट्री येथील दत्ता मोकडकर यांच्या मालकीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. ते चान्नी पोलिसांत याबाबत तक्रार देण्यास गेले असता, आधी तुम्हीच गाय शोधा नाही मिळाली तर तक्रार करा, असे त्यांना सांगण्यात आले. दोन दिवसांनंतर हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. पोलिसांचे आरोपींना अभय असल्यामुळे परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा गावकर्‍यांमध्ये आहे. गत काही दिवसांपूर्वी चतारी येथे १ लाख ८४ हजारांची चोरी झाली.

Web Title: Activists of thieves active in Chani area