शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींच्या रस्त्यांना ग्रहण

By admin | Updated: October 25, 2014 00:56 IST

अकोला शहरातील सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच नाहीत!

अकोला : गतवर्षीच्या पावसाळय़ात दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींच्या विकास कामांना ग्रहण लागले आहे. प्राप्त अनुदानातून १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. यामधील १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास उर्वरित सहा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी निविदाच सादर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. गतवर्षी २0१३ मध्ये अतवृष्टीमुळे शहरातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सिव्हील लाईन रोड, रतनलाल प्लॉट चौक, टॉवर चौक, मध्यवर्ती बस स्थानक या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. काही मोजके सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगळल्यास संपूर्ण शहरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्डय़ांमुळे नीट पायी चालणेदेखील कठीण झाले असून, याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले, वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यांची स्थिती लक्षात घेता, तत्कालीन मनपा आयुक्त दीपक चौधरी यांच्या कार्यकाळात शासनाने १५ कोटींचे अनुदान मंजूर करीत तत्काळ वितरित केले. यावर मनपाने नियोजन करून निविदा प्रक्रिया पूर्ण करणे भाग होते. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आजपर्यंंत एक-दोनदा नव्हे तर चक्क पाच वेळा निविदा प्रकाशित केल्या. १८ रस्त्यांपैकी १२ डांबरीकरणाचे रस्ते वगळल्यास सिमेंट काँक्रीटच्या सहा रस्त्यांसाठी आजपर्यंंत निविदा अर्ज प्राप्त झाले नसल्याची चिंताजनक स्थिती आहे. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच १५ कोटींच्या रस्ते दुरुस्तीला सुरुवात होईल, असा दावा मनपातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला होता. रस्त्यांची रखडलेली निविदा प्रक्रिया लक्षात घेता, प्रशासनाचा दावा कितपत खरा ठरतो, याकडे शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने सहा सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्रकाशित केली होती. दोन सिमेंट रस्त्यांसाठी निविदा प्राप्त झाली असून, येत्या २७ ऑक्टोबरला दोन्ही निविदा उघडल्या जातील, असे मनपाचे शहर अभियंता अजय गुजर यांनी स्पष्ट केले.