शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांचे जलसंकट टळले!

By admin | Updated: August 18, 2016 02:07 IST

‘मजीप्रा’चा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा; अकोला जिल्हा परिषद करणार १५ लाखांचा भरणा.

अकोला, दि. १७ : देखभाल-दुरुस्ती व पाणी देयकाच्या थकबाकीपोटी आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत (मजीप्रा) देण्यात आला होता; मात्र थकीत रकमेपैकी काही रकमेचा भरणा करणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत मंगळवारी मजीप्राला देण्यात आल्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत गावांतील जलसंकट टळले. जिल्ह्यातील आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ८४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया बाकी असल्याने, योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा तसेच देखभाल व दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी देखभाल -दुरुस्तीसह पाणी देयकाचा खर्च भागविण्याची रक्कम जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दिली जात आहे; परंतु ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत देखभाल व दुरुस्तीच्या देयकापोटी गत १ एप्रिल १0१६ पर्यंत ११ कोटी १४ लाखाची रक्कम जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे थकीत आहे,तसेच पाणी देयकापोटी गत जुलैपर्यंत ४५ लाख ७४ हजार रुपयांची थकबाकी आहे.चालू देयकापोटी तसेच थकबाकीपोटी रकमेचा जिल्हा परिषदकडून भरणा करण्यात आला नसल्याने, ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे, असा इशारा मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी १२ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिला. या पृष्ठभूमीवर थकबाकीच्या रकमेपैकी १५ लाख २५ हजार रुपये रकमेचा भरणा २३ ऑगस्टपर्यंत करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत १६ ऑगस्ट रोजी दुपारी मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय मजिप्राने मागे घेतल्याने, योजनेंतर्गत ८४ गावांमध्ये निर्माण होणारे जलसंकट तूर्त टळले आहे.