शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आकोटात गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून आठ लाखांनी फसवणूक

By admin | Updated: December 10, 2014 01:26 IST

तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

आकोट: आकोट येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीची गॅस एजन्सी नोंदवून देतो, असे सांगून आकोट येथील दोघांकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील तिघांविरुद्ध आकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक विजयनगर येथील रहिवासी रवींद्र श्रीकृष्ण रेळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निखिल संजय बोरोकार, संजय ज्ञानदेव बोरोकार, उमा संजय बोरोकार हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. ते आपले भाचा, जावई व मामेबहीण असून, त्यांनी आकोट येथे येऊन हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमार्फत चालविण्यात येणार्‍या गॅस एजन्सीचे आकोट येथे वितरक नेमावयाचे आहे, असे आपणास सांगितले. औरंगाबाद येथील ऑफिसमध्ये ओळख असल्याने आम्ही तुमच्या नावाने एजन्सी नोंदवून देतो, असेही सांगितले. त्यानुसार आपण आपले भावसासरे गणेश प्रभाकर जायले (रा. आसरा कॉलनी आकोट) यांच्याशी चर्चा करून दोघांनीही मिळून गॅस एजन्सी घ्यायचे ठरविले. त्यानुसार १४ ऑक्टोबर २0१३ रोजी निखिल, संजय व उमा हे गॅस एजन्सी देण्यासाठी आपल्या घरी आले. यावेळी त्यांनी एजन्सी चालू करण्याकरिता ९ ते १0 लाख रुपये खर्च येईल. त्यानंतर याबाबतचे कागदपत्र हस्तगत करून देऊ, असे सांगितले. त्यानुसार या कामाकरिता आपले भावसासरे जायले यांनी त्यांचा प्लॉट विकला व दोघांनी मिळून आठ लाख रुपयांची रक्कम १८ मार्च २0१४ रोजी औरंगाबाद येथून आलेल्या बोरोकार कुटुंबीयांना दिली.