शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

५७ सरपंच, सचिवांना कारवाईचा इशारा!

By admin | Updated: November 29, 2014 01:13 IST

आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्‍या ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा.

संतोष येलकर / अकोलाजिल्ह्यातील आकोट ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्‍या ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शुक्रवारी बजावलेल्या नोटीसद्वारे दिला. जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना या नोटीस निर्गमित करण्यात आल्या.जिल्ह्यातील आकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ८८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावी किंवा योजनेच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च भागविण्यासाठी दरमहा १५ लाख २५ हजार अदा करावे, अन्यथा योजनेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत गेल्या महिन्यात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाली. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल, दुरुस्ती खर्चाचे देयक जिल्हा परिषद सेस फंडातून अदा केल्यास जिल्हा परिषदेवर आर्थिक बोजा पडेल. त्यामुळे या देयकाची रक्कम पाणीपट्टी वसुलीच्या रकमेतून अदा करण्याचे १९ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले. त्यासाठी पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविणे आवश्यक असून, पाणीपट्टी वसुलीच्या कामात कसूर करणार्‍या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचेही सभेत ठरविण्यात आले होते. ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ ग्रामपंचायतींकडून गत ऑक्टोबर अखेरपर्यंत ६0 टक्के पाणीपट्टी वसुली अपेक्षित होती. तथापि, केवळ दोन टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. या पृष्ठभूमीवर पंचायत राज समितीने केलेल्या शिफरशीप्रमाणे कलम ३९ (१) अन्वये पाणीपट्टी वसुलीच्या कर्तव्यात कसूर करणार्‍या सरपंचांना पदावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे.ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची (निलंबन) कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सीईओ अरुण उन्हाळे यांनी ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना बजावलेल्या नोटीसमध्ये दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ५७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना शुक्रवारीच या नोटीस निर्गमित करण्यात आल्या.