शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: May 29, 2014 00:02 IST

पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

अकोला : बुधवारी पहिल्या टप्प्यामध्ये पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये २९ सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि १९ महिला पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिस कर्मचार्‍यांना बदल्यांविषयी उत्सुकता होती. पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यामुळे कुठे खुशीचे तर कुठे गमचे वातावरण दिसून आले.
गत आठवडाभरापासून बदल्यांसाठी पोलिस कर्मचार्‍यांच्या नावांची यादी तयार करणे सुरू होते. त्यासाठी पोलिस अधीक्षकांनी पोलिस कर्मचार्‍यांचे अर्जसुद्धा मागवले होते. काही कर्मचार्‍यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी बदल्यांचे नियोजन केले. बुधवारी पोलिस अधीक्षकांनी पहिल्या टप्प्यामध्ये २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. यादी पाहण्यासाठी सायंकाळी ५ वाजतापासूनच पोलिस अधीक्षक कार्यालयात शहरातील पोलिस कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला आपली वर्णी कोणत्या पोलिस ठाण्यात लागते, याचीच उत्सुकता होती. यादी जाहीर होताच, आपली बदली कोठे झाली, हे पोलिस कर्मचार्‍यांनी माहिती करून घेतले. दूर तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण विभागात बदली झालेल्या कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर उदासीनता जाणवत होती तर शहरामध्ये किंवा अपेक्षित पोलिस ठाण्यात, मुख्यालयात बदली झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. झालं बुवा एकदाचं! आता सहा वर्ष सुरळीत काढायचे, असाच एकंदरित सूर पोलिस कर्मचार्‍यांच्या तोंडून निघत होता.

** अनेकांनी घातले श्रींचरणी साकडे
बदल्यांचे वारे सुरू होताच, पोलिस कर्मचार्‍यांनी शहरापासून जवळ किंवा शहरातच बदलीचे ठिकाण मिळावे. यासाठी शेगावीच्या संत गजानन महाराजांच्या चरणी साकडे घातले होते. बुधवारी बदल्यांची यादी जाहीर होणार असल्याने अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी सकाळी शेगाव गाठून संत गजानन महाराजांकडे प्रार्थना केली. काही कर्मचार्‍यांची प्रार्थना फळास आली तर काहींच्या हाती निराशा आली.

** बदल्या झालेल्यांमध्ये २९ एएसआय, १९ महिला पोलिस
बुधवारी जाहीर झालेल्या यादीनुसार जिल्ह्यासह शहरातील २९ सहायक पोलिस उपनिरीक्षक, १९ महिला पोलिस कर्मचारी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, ७१ हेड कॉन्स्टेबल, ५७ पोलिस नाईक आणि २८ पोलिस कॉन्स्टेबल, अशा एकूण २0४ पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

** दुसरी यादी आज जाहीर होणार
पहिल्या टप्प्याच्या बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यातील बदल्यांची यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये विनंती अर्ज आणि इतरांचा समावेश राहील.