शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

१६ कोटींचे रस्ते; आजपासून अंतिम सुनावणी

By admin | Updated: December 10, 2014 01:57 IST

६ कोटी ७0 लाखांवर होणार घमासान.

अकोला : सिमेंट काँक्रीट रस्ताप्रकरणी मनपा प्रशासनाविरुद्ध १६ कोटींचा दावा दाखल करणार्‍या प्रतिभा कन्स्ट्रक्शनने यापूर्वीच १0 कोटींच्या मुद्दय़ावर यू टर्न घेतल्याने उर्वरित ६ कोटी ७0 लाखांच्या रकमेवर आर. बी. ट्रेडर्स लवादसमोर बुधवारपासून अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी शहर अभियंता अजय गुजर, विधिज्ञ राजन देशपांडे उपस्थित राहतील. सन २00१ मध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी शहरात १६ कोटीतून सिमेंट काँक्रीटचे १६ रस्ते तयार करण्याची योजना अंमलात आणली. प्राप्त निविदेतून प्रतिभा कन्स्ट्रक्शनला रस्त्याचे काम मिळाले. यादरम्यान १६ कोटींच्या निधीतून संबंधित कंपनीने केवळ आठ सिमेंट रस्त्यांचे निर्माण केले. उर्वरित रस्त्यांचे काम करण्यात आले नाही. उलट २00७ मध्ये प्रशासनाच्या विरोधात मुंबई स्थित आर.बी. ट्रेडर्स लवादाकडे याचिका दाखल करीत १६ कोटींचा दावा ठोकला. या दाव्यावर प्रशासनानेसुद्धा संबंधित कंपनीला प्रतिवादी करीत याचिका दाखल केली तसेच प्रतिभा कन्स्ट्रक्शनने केलेल्या रस्त्यांची पाहणी करण्याचे याचिकेत नमूद केले. त्यानुसार सन २0११ मध्ये आर.बी. ट्रेडर्सच्यावतीने शहरातील आठ सिमेंट रस्त्यांची पाहणी करण्यात आली. याप्रकरणी लवादासमोर नोव्हेंबर २0१३ मध्ये नागपूर येथे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल, हरीश आलीमचंदानी व संबंधित अधिकार्‍यांचे बयाण नोंदविण्यात आले. या सर्व मुद्दय़ांवर मुंबई येथे लवादासमोर १२ मेपासून सुनावणीला प्रारंभ झाला. सुनावणीदरम्यान ५७ पैकी १६ मुद्दय़ांवर चर्चा झाली होती. त्यावेळी अजय गुजर यांनी प्रतिभाने उपस्थित केलेले मुद्दे फेटाळून लावले होते. मनपाची बाजू लक्षात येताच, प्रतिभाने १६ कोटींपैकी १0 कोटींचा दावा मागे घेण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उर्वरित ६ कोटी ७0 लाखांचा दावा कायम असून, यासंदर्भात १0 व ११ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.