शासकीय योजनांच्या लाभांपासून कामगार वंचित

By Admin | Updated: June 25, 2016 00:38 IST2016-06-25T00:33:08+5:302016-06-25T00:38:26+5:30

अहमदनगर : बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ प्रत्यक्षात मात्र

The workers are deprived of the benefits of government schemes | शासकीय योजनांच्या लाभांपासून कामगार वंचित

शासकीय योजनांच्या लाभांपासून कामगार वंचित


अहमदनगर : बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात़ प्रत्यक्षात मात्र, या लाभार्थ्यांना या योजनांचा योग्य वेळेत लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे़
येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील दहा हजारपेक्षा जास्त कामगारांचे विविध लाभाचे प्रस्ताव धूळखात पडून आहेत़ विशेष म्हणजे या अर्जांची गेल्या वर्षभरापासून छाननीही झालेली नाही़
कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या १६ योजना राबविल्या जातात़ जिल्ह्यातील ३६ हजार ७६१ बांधकाम कामगारांची येथील कार्यालयात नोंदणी आहे़
मार्च २०१५ मध्ये एकूण २५०० प्रस्तांवाना मंजुरी देत लाभ देण्यात आला़ त्यानंतर मात्र, या कार्यालयात आलेल्या प्रस्तावाची छाननीही झालेली नाही़ येथील कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर निधीला मंजुरी मिळते़ गेल्या दीड वर्षांत आलेले प्रस्ताव अजूनपर्यंत शासनाकडे पाठविले नसल्याचे समोर आले आहे़
कामगाराच्या दोन पाल्यांना अथवा पत्नीस शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वर्षाला साडेतीन हजार, शैक्षणिक सहाय्य, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतीवर्षी एक हजार, दहावी व बारावीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास पाच हजार प्रोत्साहनात्मक सहाय्य, संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या पाल्यास शुल्काची परिपूर्ती, कामगाराचा कामावर असल्यास मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य, कामगार त्याची पत्नी किंवा पाल्याला गंभीर आजार असल्यास २५ हजार वैद्यकीय सहाय्यसाठी, प्रसूतीसाठी १० ते १५ हजार रुपये अशा विविध योजना कामगारांच्या कल्याणासाठी राबविल्या जातात़
(प्रतिनिधी)

Web Title: The workers are deprived of the benefits of government schemes