शेवगाव पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST2021-07-30T04:23:08+5:302021-07-30T04:23:08+5:30

शेवगाव : येथील पोलीस ठाण्यात तालुक्यातील मजलेशहर गावातील महिलांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गावातील अवैध धंदे बंद करावेत, ...

Women sit at Shevgaon police station | शेवगाव पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या

शेवगाव पोलीस ठाण्यात महिलांचा ठिय्या

शेवगाव : येथील पोलीस ठाण्यात तालुक्यातील मजलेशहर गावातील महिलांनी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास गावातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले.

मजलेशहर येथील राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ बचत गटाच्या महिला सदस्यांनी हे आंदोलन केले. गावातील अवैध दारूमुळे अनेकांचे संसार मोडकळीस आले आहेत. गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे येथे जुगार, मटका, अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली. यापूर्वी २० जून रोजी अर्ज करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे यावेळी महिलांनी सांगितले. तत्काळ कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर १८ ऑगस्टला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी पोलिसांना निवेदन दिले.

निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या शारदा मुकुटमल, सुवर्णा मोटे, सुलभा खरात, सिंधू पहिलवान, अलका मिसाळ, लता जगताप, कमल नरवडे, वनिता जगताप आदींच्या सह्या आहेत.

---

२९ शेवगाव पोलीस

शेवगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन प्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन देताना मजलेशहर येथील महिला.

Web Title: Women sit at Shevgaon police station