कुजबूज......मुलांसह पालकही पाहताहेत शाळा उघडण्याची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:35+5:302021-09-07T04:26:35+5:30

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. घरूनच मुलांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. सकाळी दोन ते तीन तासांत क्लास ...

Whispers ...... Parents with children are waiting for the school to open | कुजबूज......मुलांसह पालकही पाहताहेत शाळा उघडण्याची वाट

कुजबूज......मुलांसह पालकही पाहताहेत शाळा उघडण्याची वाट

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. घरूनच मुलांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. सकाळी दोन ते तीन

तासांत क्लास संपला की, मुले मोकळी होतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने पहिल्यासारखे घराबाहेर जाऊन मनसोक्त बागडता येत नाही. त्यामुळे मुले घरातच कोंडून पडली आहेत. अशा परिस्थितीत अभ्यासातही मन लागत नाही. मग सुरू होतात मुुलांचे वेगवेगळे प्रयोग! यातून घरात कागदांचा ढीग, रंगाची उधळण, थर्माकोलचे तुकडे, भिंतीवर चित्रे रेखाटणे असा पसारा तयार होतो. मुलांच्या या पसारा प्रयोगाला घराघरातील आई-वडील चांगलेच वैतागले आहेत. हे थांबले की, मोबाईलवर गेम अथवा टीव्हीवर कार्टून पाहणे हे ठरलेलेच. शाळा असते तेव्हा मुलांचे सर्व शेड्यूल ठरलेले असते. त्यावेळी घर शांत असते. त्यामुळे कोरोनाचे सावट संपून लवकर शाळा उघडावी, अशीच पालकांची इच्छा आहे. मित्रांना भेटता येईना, मैदानी खेळ खेळता येईना, मोबाईलवर क्लास करायचा कंटाळा आलाय. आमची शाळा लवकर उघडावी, अशी मुलांचीही इच्छा आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटली की, शाळा उघडतील पण तिसऱ्या लाटेचे संकट कायम असल्याने अजून तरी काही दिवस हे सहन करावे लागेल, असेच संवाद घराघरात ऐकायला मिळत आहेत.

Web Title: Whispers ...... Parents with children are waiting for the school to open