शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

..ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचविणार : लंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

पारनेर : स्वतःच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनातून वाचवू शकले नाहीत, ते सर्वसामान्यांना कसे वाचविणार. कोरोना संकट काळात दोन वर्षे बिळात ...

पारनेर : स्वतःच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनातून वाचवू शकले नाहीत, ते सर्वसामान्यांना कसे वाचविणार. कोरोना संकट काळात दोन वर्षे बिळात होते. त्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही, अशा शब्दांत आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

रविवारी करंदी (ता. पारनेर) येथील कार्यक्रमात लंके बोलत होते.

माजी आमदार औटी यांनी केलेल्या टीकेला लंके यांनीही प्रथमच औटी यांचे नाव न घेता खरमरीत उत्तर दिले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्यासह आत्मा समितीचे अध्यक्ष ॲड. राहुल झावरे, मारुती रेपाळे, सरपंच नामदेव ठाणगे, किरण ठुबे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब ठाणगे, प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, उपसरपंच सुनील चव्हाण, चंद्रभान ठुबे, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, सत्यम निमसे, लखन ठाणगे, शरद गोरे, महेंद्र गायकवाड, शारदा गांगड, सोनाली चौधरी, मंगल चौधरी, मनीषा ठाणगे, जितेंद्र उघडे, सुनीता औटी, सुनील ठाणगे, भाऊसाहेब पिंपरकर, आदी उपस्थित होते‌.

लंके म्हणाले, कोरोना संकट काळात जे दोन वर्षे बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. माझा पिंड काम करण्याचा आहे. मी कामातच राम मानणारा आहे. कोरोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोविड उपचार केंद्रात तब्बल १७ हजार १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले.

----

झावरेंची खंबीर साथ..

लंके म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून प्रस्थापितांनी मला कधीच स्वीकारले नाही. माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. या पार्श्वभूमीवर माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण त्यांनीही प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती राहुल झावरेही काम करीत असल्याचे लंके यांनी सांगितले.