भाग्यश्री फंडचे श्रीगोंद्यात जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:09+5:302021-09-23T04:24:09+5:30

श्रीगोंदा : येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय व इंटरनॅशनल महिला कुस्ती केंद्राची मल्ल भाग्यश्री फंड हिचे श्रीगोंदा येथे आगमन ...

Welcome to Bhagyashree Fund in Shrigonda | भाग्यश्री फंडचे श्रीगोंद्यात जंगी स्वागत

भाग्यश्री फंडचे श्रीगोंद्यात जंगी स्वागत

श्रीगोंदा : येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय व इंटरनॅशनल महिला कुस्ती केंद्राची मल्ल भाग्यश्री फंड हिचे श्रीगोंदा येथे आगमन होताच बसस्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले.

भाग्यश्री फंड हिने अमेठी येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या कुस्ती स्पर्धेत ५९ किलो वजन गटात रौप्यपदक पटकाविले आहे. त्यानंतर भाग्यश्री प्रथमच नाशिकवरून बसने श्रीगोंद्यात आगमन आली.

भाग्यश्रीचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, सरपंच अमोल थोरवे, महाराजा कॉलेज पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, प्रा. अरुण जाधव, प्रा. बाळासाहेब शेटे, प्रा. श्रीकांत थोरात, प्रा. रमेश भुजबळ, प्रा. सुनील टकले, प्रा. संदीप दरेकर, प्रा. रामदास ढगे, प्रा. संजय डफळ, सुरेश पालवे, वडील हनुमंत फंड, पूजा फंड, मनीषा काकडे, नामदेव फंड आदी उपस्थित होते.

आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के यांनी तिचे कौतुक केले.

यावेळी भाग्यश्री फंड म्हणाली, २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या मैदानात उतरणे हेच ध्येय असून त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

---

२२ श्रीगोंदा भाग्यश्री

भाग्यश्री फंड हिचे श्रीगोंदा येथे बसस्थानकावर नागरिकांनी जंगी स्वागत केले.

Web Title: Welcome to Bhagyashree Fund in Shrigonda