संगमनेरात टोल नाक्यावर बुधवारी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:04+5:302021-09-06T04:25:04+5:30

संगमनेर : नाशिक- पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर संगमनेर तालुक्यातील रहिवाशांना टोलमाफी करण्यात आली आहे. मात्र, फास्टॅग ...

Wednesday agitation at Toll Naka in Sangamnera | संगमनेरात टोल नाक्यावर बुधवारी आंदोलन

संगमनेरात टोल नाक्यावर बुधवारी आंदोलन

संगमनेर : नाशिक- पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावर संगमनेर तालुक्यातील रहिवाशांना टोलमाफी करण्यात आली आहे. मात्र, फास्टॅग असलेल्या वाहन चालकांना टोलमाफी दाखवून काही वेळानंतर अथवा दुसऱ्या दिवशी बँकेशी जोडलेल्या फास्टॅगमधील पैसे कापले जातात. त्यामुळे बुधवारी (दि.०८) सकाळी दहा वाजता टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे.

स्थानिक वाहनधारकांच्या वाहनांची फास्टॅगविरहित स्वतंत्र रांग करावी. खड्डे, स्ट्रीट लाइट, सर्व्हिस रस्ते दुरुस्ती, तसेच न झालेले सर्व्हिस रस्ते व इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक बांधीलकी असलेले ‘आम्ही संगमनेरकर’ असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यात येते आहे. एक संगमनेरकर म्हणून आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Wednesday agitation at Toll Naka in Sangamnera