गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST2021-08-22T04:24:28+5:302021-08-22T04:24:28+5:30

कोपरगाव : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तसेच नातेवाइकाला मारहाण केल्याच्या रागातून दोन गटांत शिवीगाळ करीत बेल्टने, लोखंडी रोडने ...

Violent clashes between the two groups out of anger over the filing of the crime | गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

गुन्हा दाखल केल्याच्या रागातून दोन गटांत तुंबळ हाणामारी

कोपरगाव : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तसेच नातेवाइकाला मारहाण केल्याच्या रागातून दोन गटांत शिवीगाळ करीत बेल्टने, लोखंडी रोडने दोन गटांत एकमेकांना तुंबळ मारहाण केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील बोकली येथे शुक्रवारी (दि.२०) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन्ही गटांतील रघुनाथ अण्णा राजपूत (वय ३२), कृष्णा नाना कडाळे (रा. बोलकी, ता. कोपरगाव) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

रघुनाथ अण्णा राजपूत यांनी शरद नाना कडाळे, किशोर अण्णा राजपूत (दोघे रा. बोलकी, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तर कृष्णा नाना कडाळे यांनी सागर संजू पवार, नाना संजू पवार (दोघे रा. बिरोबाचौक संवत्सर, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Web Title: Violent clashes between the two groups out of anger over the filing of the crime