मायगाव देवी येथील ग्रामस्थ मनमानी कारभाराने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:09+5:302021-08-26T04:23:09+5:30

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा मुख्य दुवा मानला जातो. त्यामुळे ग्रामसेवकाने कर्तव्यावर हजर असणे महत्त्वाचे आहे. मायगाव देवी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये ...

Villagers of Mayagaon Devi suffer from arbitrary management | मायगाव देवी येथील ग्रामस्थ मनमानी कारभाराने त्रस्त

मायगाव देवी येथील ग्रामस्थ मनमानी कारभाराने त्रस्त

ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा मुख्य दुवा मानला जातो. त्यामुळे ग्रामसेवकाने कर्तव्यावर हजर असणे महत्त्वाचे आहे. मायगाव देवी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित नसतात, ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित ग्रामसेवक मनमानी कारभार करत असून मागील पंधरा दिवसांपासून ते गावात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करून सुद्धा पंचायत समितीने कुठलीच कारवाई केली नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी किंवा दुसरे ग्रामसेवक देण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

...........

माझी मळेगाव थडी येथून बदली झाली असून आज दुसऱ्या ग्रामसेवकाकडे चार्ज देत आहे. मी उद्या मायगाव देवीला येणार आहे.

- बी. ओ. पाटील, ग्रामसेवक, मायगाव देवी

..................

पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गावात न आल्यामुळे ग्रामस्थांची विविध कामे तसेच गावातील विकासात्मक कामे खोळंबली आहेत. तरी अशा कामचुकार ग्रामसेवकाची बदली करून दुसरा ग्रामसेवक द्यावा.

- इब्राहिम शेख, कोपरगाव तालुका अध्यक्ष, भीम आर्मी संघटना.

.................

पंचायत समिती सभापती व गटविकास अधिकारी यांच्याकडे या ग्रामसेवकाची वेळोवेळी तक्रार केलेली असून नवीन ग्रामसेवक देण्याची मागणी केलेली आहे. तरी गटविकास अधिकारी यांनी नवीन ग्रामसेवक देण्याचे मान्य केले आहे.

- मुकुंदराव गाडे, सरपंच, मायगाव देवी

Web Title: Villagers of Mayagaon Devi suffer from arbitrary management