राज्यातील लसीकरण महाविकास आघाडीमुळे नव्हे तर माेदींमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:52+5:302021-07-30T04:22:52+5:30

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांकरिता ५० टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय ...

Vaccination in the state is not because of Mahavikas Aghadi but because of Maedi | राज्यातील लसीकरण महाविकास आघाडीमुळे नव्हे तर माेदींमुळे

राज्यातील लसीकरण महाविकास आघाडीमुळे नव्हे तर माेदींमुळे

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांकरिता ५० टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय घेतल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍या ओबीसी आघाडीच्या वतीने विखे पाटील यांचा सत्कार करण्‍यात आला. त्यावेळी विखे बोलत होते.

विखे म्हणाले, मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांसाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने या शैक्षणिक वर्षासाठी ५० टक्‍के फी माफ करण्‍याच्‍या निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या विचारांची प्रेरणा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने या देशातील सामान्‍यातील सामान्‍य माणसाला विकासाच्या मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी निर्णय केले आहेत. ३४ वर्षांनंतर या देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले. नव्‍या शैक्षणिक धोरणात ही प्रत्‍येक समाज घटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात यावा हाच विचार शैक्षणिक धोरणात आहे.

याप्रसंगी ओबीसी आघाडीचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजूरकर, प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब गाडेकर, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, भाजपाचे उपाध्यक्ष नितीन कापसे, भाजयुमोचे तालुका अध्‍यक्ष सतीश बावके, किसान आघाडीचे तालुका प्रमुख बाळासाहेब डांगे, महिला जिल्‍हाध्‍यक्षा पुष्‍पलता हरिदास, कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र चव्‍हाण, श्रीरामपूर बाजार समितीचे संचालक मनोज हिवराळे यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vaccination in the state is not because of Mahavikas Aghadi but because of Maedi