घुटेवाडी येथे लसीकरण मोहीम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST2021-05-24T04:20:07+5:302021-05-24T04:20:07+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...

Vaccination campaign should be carried out at Ghutewadi | घुटेवाडी येथे लसीकरण मोहीम राबवावी

घुटेवाडी येथे लसीकरण मोहीम राबवावी

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

घुटेवाडी हे गाव चिखली घाटाजवळील डोंगर रांगांमध्ये असल्याने विसापूर व कोळगाव या सारख्या गावांशी दैनंदिन संपर्क साधला जात नाही. या ठिकाणच्या लोकांना गरजेपुरताच या गावांशी संबंध येतो. दुर्गम भागात हे गाव असल्याने येथील लोकांना शासकीय योजनांचा फारसा लाभ मिळत नाही. या ठिकाण साधी एसटी बसही येत नाही. अशात येथील ज्येष्ठ नागरिकांना कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी जाणे शक्य नसल्याने ते अद्यापही लसीकरणापासून वंचित आहेत. परिसरातील सुरेगावसारख्या गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आली. मात्र तेथे स्थानिक नागरिकांचीच गर्दी झाल्याने घुटेवाडीकरांना तेथेही लस घेण्याची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने घुटेवाडी येथे लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी सरपंच दारकुंडे, उपसरपंच सत्यवान गव्हाणे व पदाधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकार यांच्याकडे केली आहे.

Web Title: Vaccination campaign should be carried out at Ghutewadi