शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या तक्रारीसाठी ‘त्या’ दोघांनी गाठले नगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

सिद्धटेक : कर्जत तालुक्यातील भांबोरा-दुधोडी रस्ता आठच दिवसात उखडल्याने येथील दोघा दिव्यांगांनी तक्रार करण्यासाठी गुरुवारी थेट नगर गाठले. येथे ...

सिद्धटेक : कर्जत तालुक्यातील भांबोरा-दुधोडी रस्ता आठच दिवसात उखडल्याने येथील दोघा दिव्यांगांनी तक्रार करण्यासाठी गुरुवारी थेट नगर गाठले. येथे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून रस्त्याच्या दर्जाबाबत माहिती दिली.

शेती, व्यापार या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या भांबोरा-दुधोडी या रस्त्याचे काम आठ दिवसांपूर्वी झालेले होते. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते पूर्णत: उखडले आहे. रस्त्यावर साचलेल्या कचमुळे दुचाकीस्वार पडून अपघात होत आहेत. एक कोटी तीस लाख रुपये अंदाजपत्रकाचे २६५० मीटरचे रस्त्याचे काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. मध्यंतरीच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाळ्यात काम सुरू झाले. मुरूम, चिखलमाती यावरच कमी प्रतीचा डांबराचा थर देत असल्यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु, याकडे त्यांनी कानाडोळा केला होता.

या अगोदरही निकृष्ट कामामुळे एप्रिलमध्ये ‘लोकमत’ने या विषयी आवाज उठविला होता. त्यावेळी भांबोरा ग्रामस्थांनी काम बंद केले होते. मोठ्या अंदाजपत्रकाच्या कामाचा एक साधा फलकही कुठे दिसत नाही. प्रत्येक वेळी वेगळा ठेकेदार दिसत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या एजन्सीने काम घेतले आहे. काम कसे आहे हे समजायला तयार नाही. याचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीला मिळेना.

राजेंद्र रणदिवे व नितीन वायकर यांनी या रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी ग्रामपंचायत, ठेकेदार, सा. बां. विभाग यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, काम निकृष्ट झाल्याने त्यांनी त्यांच्या तीनचाकी वाहनावरून शंभर किमीचा प्रवास करत थेट नगर गाठत कार्यकारी अभियंता संजय पवार यांचे कार्यालय गाठले व निवेदन दिले.

----

स्थानिक प्रशासन हतबल

नगरच्या एका एजन्सीने या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला आहे. त्याने पोट ठेकेदार नेमला आहे. प्रशासनाने बऱ्याच वेळा संपर्क केल्यानंतर काम सुरू झाले. ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत आहे. प्रशासन त्याच्यापुढे हतबल दिसत आहे.

रस्त्यावर चिखल, माती, मुरूम त्यामध्ये कमी प्रतीचे डांबर टाकले. रस्ता आठ दिवस टिकला नाही याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये.

-राजेंद्र रणदिवे, नितीन वायकर, मिनीनाथ रणदिवे

ग्रामस्थ, भांबोरा

------

भांबोरा-दुधोडी रस्ता कामाबाबत उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

-संजय पवार,

कार्यकारी अभियंता सा. बां. नगर

---------

२३ भांबोरा रोड

भांबोरा-दुधोडी रस्त्यावर साचलेली कच