विसापूरच्या एकाच वस्तीवर आढळले वीस कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:26+5:302021-07-30T04:22:26+5:30
विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे एका आठवड्यात २० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण एकाच वस्तीवरील ...

विसापूरच्या एकाच वस्तीवर आढळले वीस कोरोना बाधित
विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथे एका आठवड्यात २० कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हे सर्व रुग्ण एकाच वस्तीवरील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे कोरोनाबाबतचे नियम काहीसे शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकही सार्वजनिक कार्यक्रमांसह बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यामुळे येथे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. येथे एकाच वस्तीवर वीस कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे येथील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तहसीलदारांच्या सुचनेनुसार गुरुवारी (दि. २९) सकाळी सात वाजेपासून सोमवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी सात वाजेपर्यंत मेडिकल व दवाखाने सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे. दुकाने उघडलेली आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच अरविंद जठार यांनी दिला आहे.