मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 07:58 IST2020-12-23T07:57:26+5:302020-12-23T07:58:01+5:30

श्रीगोंदा : बुधवारी पहाटे श्रीगोंदा येथून तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२डबे रुळावरून घसरले आहेत.  त्यामुळे मोठा अपघात झाला आहे.  मात्र  कोणतीही जीवीत  हानी झालेली नाही. त्यामुळे दौड मनमाड लोहमार्गावरील सर्व वाहतुक ठप्प झाली आहे.

Twelve coaches of the freight train derailed | मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले

मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरले

श्रीगोंदा : बुधवारी पहाटे श्रीगोंदा येथून तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून मनमाड कडे जाणाऱ्या मालगाडीचे १२डबे रुळावरून घसरले आहेत.  त्यामुळे मोठा अपघात झाला आहे.  मात्र  कोणतीही जीवीत  हानी झालेली नाही. त्यामुळे दौड मनमाड लोहमार्गावरील सर्व वाहतुक ठप्प झाली आहे.

परंतु रेल्वे रुळांचं मात्र मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून या रेल्वे अपघातामुळे दौंड नगर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत. सिमेंट वाहतूक करणाऱ्या या मालवाहतूक गाडीला ४२डबे होते. त्यातील १२डबे रुळावर घसरले सदर घटनेबाबत बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर पेट्रोलिंग करणाऱ्या पो उपनिरीक्षक दिलीप तेजनकर व पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. रेल्वेमार्ग दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक  दुरुस्तीचे काम पुर्ण होई पर्यंत बंद राहणार आहे.

Web Title: Twelve coaches of the freight train derailed