सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी ( दि. २५) आदिवासी बांधवांना खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य व किराणा किटचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती मीरा शेटे, सदस्य शांता खैरे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, गणपतराव सांगळे, अॅड. सुहास आहेर, सुभाष सांगळे, पंचायत समिती सदस्या स्वाती मोरे, राजुर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे, प्रा. बाबा खरात, जयहिंद आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दशरथ वर्पे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोरोना संकटात गोरगरीब आदिवासी बांधवांना मदत मिळावी याकरीता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी अत्यंत चांगली योजना राबविली. खावटी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे दहा लाख आदिवासी बांधवांना याचा लाभ मिळाला. दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचे अन्नधान्य, किराणा वितरित करण्यात आला. यापुढील काळातही विविध योजनांचा लाभ घेत सर्वांनी आपल्या जीवनात प्रगती साधावी. यावेळी सुरेश राठोड, रमेश उदमले, मीना आदमाने, राहुल शिरसाट, सुहास दुधाट, निवृत्ती लेंडे, अर्चना मोरे आदी उपस्थित होते.