प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:35+5:302021-07-30T04:22:35+5:30
निंबळक : वृक्ष लागवड करताना त्यांचे संवर्धन कसे करता येईल याचे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने घरासमोर वृक्ष लागवड ...

प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड व्हावी
निंबळक : वृक्ष लागवड करताना त्यांचे संवर्धन कसे करता येईल याचे नियोजन केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने घरासमोर वृक्ष लागवड करायला हवी, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
बोल्हेगाव येथील नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट संचलित राघवेंद्र स्वामी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व देवेंद्रनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महापौर शेंडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नगरसेवक, संस्थेचे खजिनदार मदन आढाव होते.
यावेळी युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सचिन शिंदे, दत्ता सप्रे, नीलेश भाकरे, आकाश कातोरे, अंबादास शिंदे, रावसाहेब म्हस्के, शहर जिल्हाध्यक्ष पारुनाथ ढोकळे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अमोल शिंदे यांनी केले. आढाव यांनी महापौर यांना बोल्हेगाव परिसर, विद्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची पूर्तता करण्यासंदर्भात मागणी केली. राठोड यांनी आवश्यक सर्व निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सूत्रसंचालन किरण डहाणे यांनी केले. वैशाली अकोलकर यांनी कार्यक्रम नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी नायर, वंदना पुरनाळे, संजय सावंत, किशोर डाके, उमेश भोईटे, गणेश राजदेव, प्रवीण भोसले, चैताली कुलकर्णी यांनी प्रयत्न केले.