वृक्षदान हीच चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:28+5:302021-02-23T04:33:28+5:30

पाथर्डी : रक्तदानाप्रमाणेच वृक्षदान हा एक चांगला सामाजिक‍ उपक्रम आहे. तो प्रत्येक गावामध्ये राबविण्याची गरज असून, ...

Tree donation should be the movement | वृक्षदान हीच चळवळ व्हावी

वृक्षदान हीच चळवळ व्हावी

पाथर्डी : रक्तदानाप्रमाणेच वृक्षदान हा एक चांगला सामाजिक‍ उपक्रम आहे. तो प्रत्येक गावामध्ये राबविण्याची गरज असून, याचीही चळवळ होणे गरजेचे आहे, असे मत भाजपचे नेते गोकुळ दौंड यांनी केले. कळसपिंप्री (ता.पाथर्डी) येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आमदार मोनिका राजळे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या वृक्षदान कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी १०१ केशर जातीच्या आंबा रोपांचे वाटपाचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भवार, टाकळीमानूरचे सरपंच शुभम गाडे, वृद्धेश्वरचे संचालक बाबासाहेब किलबिले, कोरडगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष नारायणराव काकडे, युवानेते दिगंबर भवार, उपसरपंच संजय पवार, भानुदास शेळके, दत्तात्रय गणगे, बाबासाहेब मिसाळ, शिवाजीराव मिसाळ, शिवाजी शेळके, अमीन शेख, लक्ष्मण तरटे, महादेव भराट, सुभाष गाडे, दादासाहेब मापारे, मुरलीधर येढे, नरहरी शेळके, लक्ष्मण तरटे आदी उपस्थित होते.

Web Title: Tree donation should be the movement