लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 23:04 IST2026-03-03T23:04:26+5:302026-03-03T23:04:26+5:30
श्रीगोंद्यातील शिवाजीनगर परिसरात प्रेमातून घडली भीषण घटना

लग्नास नकार दिल्याने टोकाचे पाऊल! श्रीगोंद्यात प्रेयसीच्या डोळ्यादेखील तरुणाने संपवली आपली जीवनयात्रा
श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर): प्रेयसीने लग्नास नकार दिला या रागाच्या भरात सागर सखाराम निंबाळकर (वय २५, रा. श्रीगोंदा स्टेशन) याने प्रियसीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी श्रीगोंदा शहरातील शिवाजीनगर परिसरात राजाराम औटी यांच्या घरात घडली आहे. त्यांनी मुलीस खोली भाड्याने दिली होती. त्या खोलीत ती राहत होती.
सागर निंबाळकर हा श्रीगोंदा शहरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलीस लग्नाची गळ घालत होता. पण तीने लग्नास नकार दिला. त्याच तणावातून सागर निंबाळकर याने जीवनयात्रा संपून टाकली आहे. याबाबतची खबर सागरचा चुलत भाऊ किरण निंबाळकर याने श्रीगोंदा पोलिस स्टेशन दिली आहे. श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.