खंडणी घेताना श्रीरामपुरात तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:46+5:302021-07-22T04:14:46+5:30

श्रीरामपूर येथील हुसेन दादाभाई शेख याने सोमवारी (१९ जुलै) राहाता विभागातील वनरक्षक बेडवाल यांना फोन केला. तुम्ही केलेल्या ...

Three caught by police in Shrirampur while taking ransom | खंडणी घेताना श्रीरामपुरात तिघे पोलिसांच्या जाळ्यात

खंडणी घेताना श्रीरामपुरात तिघे पोलिसांच्या जाळ्यात

श्रीरामपूर येथील हुसेन दादाभाई शेख याने सोमवारी (१९ जुलै) राहाता विभागातील वनरक्षक बेडवाल यांना फोन केला. तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत हायकोर्टात जाणार असल्याचे सांगत शेख याने बेडवाल यांना २५ लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती १२ लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम दिली नाही तर हातपाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी शेख याने दिली. या रकमेतील दोन लाख वीस हजार रुपये मंगळवारी (२० जुलै) देण्याचे ठरले. ही रक्कम न दिल्यास हातपाय तोडण्याची धमकी शेख याने फोनवरून दिली.

त्यानंतर वनरक्षक बेडवाल, राहाता वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने सापळ्याचे नियोजन केले. मंगळवारी लोणी पोलीस ठाण्याचे पथक, वनरक्षक बेडवाल आणि दोन पंच खासगी वाहनाने लोणी येथून श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर १, साई व्हिला येथे वास्तव्यास असलेल्या हुसेन दादाभाई शेख याच्या घराजवळ आले. बेडवाल यांना एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम घेऊन शेख याच्या घरात पाठविण्यात आले. तेथे शेख याच्या घरात अनिल गोपीनाथ आढाव (रा. विरोबा लवनरोड, लोणी खुर्द, ता. राहाता), सलीम बाबामियॉं सय्यद (रा. माळहिवरा, गेवराई, बीड) हे हजर होते. यावेळी खंडणी घेताना पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तिघेही पोलीस पथकाच्या सापळ्यात अडकले. तिघांना रकमेसह ताब्यात घेत अटक करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस नाईक सविता भांगरे, पोलीस नाईक संपत जायभाये, दीपक रोकडे, मच्छिंद्र इंगळे, सोमनाथ वडणे यांचे पथक पुढील तपास करत आहेत.

210721\img-20210721-wa0101.jpg

खंडणी घेताना श्रीरामपुरात तिघे जेरबंद

लोणी पोलिसांची कारवाई, वनरक्षकाला खंडणीची मागणी करत दिली जीवे मारण्याची धमकी

Web Title: Three caught by police in Shrirampur while taking ransom