शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर हजार भाविकांनी पाळले मौन

By admin | Updated: January 31, 2016 23:30 IST

अहमदनगर : मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण़़़ भजन, भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक़़़ ११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन ही धून वाजली

अहमदनगर : मेहेर टेकडीवर मेहेरबाबांच्या जयघोषाने प्रफुल्लीत झालेले वातावरण़़़ भजन, भक्तीगितांत तल्लीन झालेले भाविक़़़ ११ वाजून ४५ मिनिटांनी बिगिन दि बिगिन ही धून वाजली त्यानंतर मेहेरधून म्हणण्यात आली़ घड्याळात बाराचा ठोका पडताच मेहेर टेकडीवरील सत्तर हजार मेहेरप्रेमींनी मौनव्रत धारण केले़ जल्लोषपूर्ण वातावरणाचे १५ मिनिटे शांततेत रुपांतर झाले़ १२ वाजून १५ मिनिटांनी ‘मेहेरबाबा की जय’ चा जयघोष करत भाविकांनी मौन सोडले़ आरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे रविवारी अवतार मेहेरबाबांच्या अमरतिथी सोहळ्यातील मौनव्रत सोहळा पार पडला़ यावेळी देश-विदेशातील सत्तर हजार भाविक उपस्थित होते़ ३१ जानेवारीला बाबांनी देहत्याग केला होता़ तेव्हापासून अमरतिथी सोहळ्यात या दिवशी भाविक १५ मिनिटांचे मौन पाळतात़ या सोहळ्यासाठी भाविक आवर्जून येतात़ रविवारी मौनव्रताआधी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर यांनी मेहेरबाबांबद्दल माहिती सांगितली़ रविवारी सकाळी बाबांनी सुरू केलेल्या धुनीजवळ हजारो भाविक उपस्थित होते़ सकाळी ६ वाजता भजनास सुरुवात झाली, नंतर मेहेरधून म्हटली गेली व सूर्योदयास धुनी पेटविण्यात आली. त्यामध्ये भाविकांनी आपल्यातील दुर्गुणाचे प्रतीक म्हणून लाकडाची काडी टाकली व दर्शन घेतले़ सकाळी ८ वाजता मुख्य मंडपात कार्यक्रम सुरू झाले़ दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ जगातील ७० देश व भारतातून सुमारे लाखांच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत, परदेशातील ४०० भाविक आले आहेत़ (प्रतिनिधी)अमरतिथी सोहळ्यात विदेशातून आलेल्या भाविकांच्यावतीने मेहेराबाद येथे गेल्या दोन दिवसांपासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे़ शनिवारी रात्री भजन, गजल, नृत्य, कव्वाली, गाणे, नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली़ मेहेराबाद येथे जाण्यासाठी नगर शहरातील तीनही बसस्थानकातून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ मेहेराबाद येथे रेल्वेचा थांबाही सुरू करण्यात आल्याने भाविकांची अडचण दूर झाली़