शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून मंदिर पुन्हा ‘लक्ष्य‘

By admin | Updated: August 24, 2014 23:08 IST

पारनेर : पारनेर तालुक्यात चोरट्यांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे.

पारनेर : पारनेर तालुक्यात चोरट्यांनी मंदिरांना ‘लक्ष्य’ करण्याचा प्रकार सुरूच ठेवला आहे. कर्जुले हर्या येथील हरेश्वर मंदिरात शनिवारी रात्री चोरीचे घटना घडली. तर जागतिक दर्जाचे लवणस्तंभ असलेल्या दर्याबाई पाडळी येथील दर्याबाई मंदिराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. तसेच पारनेर येथे पोलिसांनी मोटारसायकल चोरणारी टोळी पकडली. नारायणगव्हाण गावात सरपंचाच्या पतीने महिलांना मारहाण केल्याची घटना घडली.कर्जुले हर्या, दर्याबाई पाडळीत चोरी शनिवारी रात्री चोरट्यांनी पाचव्यांदा नगर -कल्याण महामार्गावरील कर्जुले हरेश्वर येथील हरेश्वर मंदिरातील खिडकीचे गज कापून मंदिरातील तीनशे रूपये चोरल्याचीे घटना सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अनिल आंधळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हरेश्वर मंदिरात ग्रामस्थांनी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविले असून कॅमेऱ्यात एक चोर कैद झाल्याचे दिसत आहे. चोरीचे प्रकार सारखे घडत असून पोलिसांनी तातडीने चोरीचा तपास लावून आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दर्याबाई मंदिरात चोरीचा प्रयत्नलवणस्तंभांमुळे जगप्रसिध्द असलेल्या दर्याबाई पाडळी येथील दर्याबाई देवीच्या मंदिरात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला व तेथील कपाट उचकून साहित्य अस्ताव्यस्त फेकले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी मंदिराची पाहणी केली. मात्र कोणीही याबाबत फिर्याद दिली नाही.मोटारसायकल चोर टोळी पकडलीपारनेर शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, नागेश्वर मित्र मंडळाचे आशिष औटी यांच्यासह अनेकांची वाहने चोरीस गेली होती. या मोटारसायकल चोऱ्यांमुळे पोलिसही हतबल झाले होते. शनिवारी दुपारी तीन तरूण एक मोटारसायकल घेऊन कान्हूरपठारस्त्यावरील ढाब्यासमोरून चालले असताना पोलीस अण्णा पवार व निमसे यांनी त्यांना हटकले व विचारपूस केल्यावर मोटारसायकल चोरीची असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रोहित पोपट औटी रा.वरखेड मळा पारनेर यासह दैठणेगुंजाळ येथील एक व अन्य एका अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यात रोहीत औटी याला पारनेर न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दहा मोटारसायकली चोरल्याचा अंदाजया मोटारसायकल चोरांनी पारनेर शहरासह परिसरात सुमारे दहा ते बारा मोटारसायकली चोरल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर यातील चोरीचे प्रकार उघडकीस येतील असे पोलिसांनी सांगितले.शेत नांगरणीवरुन दोन गटात हाणामारीकर्जत : शेत नांगरणीवरुन दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सासू, सून जखमी झाल्या. यासंदर्भात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून याप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. तालुक्यातील बारडगाव सुद्रिक शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी पार्वती हरिभाऊ फरांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आमच्या घास पिकात हरिभाऊ कदम यांनी ट्रॅक्टर घालून नांगरणीला सुरुवात केली. याचा जाब विचारताच शिवीगाळ करुन दमदाटी करण्यात आली. व घासाचे नुकसान केले. त्यानंतर माझ्यासह सून संगीता शिवाजी फरांडे हिला मारहाण करण्यात आली. या फिर्यादीवरुन कर्जत पोलिसांनी जगन्नाथ मारुती कदम, रवींद्र जगन्नाथ कदम,भाऊसाहेब जगन्नाथ कदम,सुरेश जगन्नाथ कदम, विजय भगवान गावडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. मारहाणीमध्ये काठी, चैन, केबड यांचा वापर करण्यात आला. शेत नांगरण्यास अडथळा आणल्याच्या कारणावरुन दुसरी फिर्याद साधना भाऊ कदम यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी हरिभाऊ बयाजी फरांडे, पार्वती हरिभाऊ फरांडे, संदीप हरिभाऊ फरांडे, संगीता शिवाजी फरांडे, शिवाजी हरिभाऊ फरांडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पो.कॉ. गोसावी करीत आहेत.