गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचे फावते आणि मोबाइल जातात चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:22+5:302021-08-17T04:26:22+5:30

संगमनेर : मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. अनेकांच्या हातात विविध कंपन्यांचे महागडे, आकाराने मोठे असलेले मोबाइल ...

Thieves and mobiles are stolen in crowded places | गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचे फावते आणि मोबाइल जातात चोरीला

गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचे फावते आणि मोबाइल जातात चोरीला

संगमनेर : मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. अनेकांच्या हातात विविध कंपन्यांचे महागडे, आकाराने मोठे असलेले मोबाइल पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांत मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. आकाराने मोठे असलेले मोबाइल हातात आणि खिशातही बसत नाहीत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांचे फावते आणि मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार घडतात.

रेल्वे, बसमधून प्रवास करताना अनेकदा गर्दी असते. अशा वेळी मोबाइल चोरणाऱ्यांची टोळी सक्रिय असते. हातात असलेला, खिशात ठेवलेला मोबाइल चोरटे अगदी सहज काढून घेतात. काही वेळाने मोबाइल पाहायला गेल्यानंतर तो सापडत नाही. ज्यांचे मोबाइल चोरीला जातात, ते अगदी गोंधळून जातात. रेल्वे स्थानक, बसस्थानक, भाजी बाजार, गर्दीच्या ठिकाणी, पायी चालतानादेखील मोबाइल चोरीच्या अनेक घटना घडतात. तसेच निर्जनस्थळी रस्त्यात पादचाऱ्यांना, दुचाकीस्वारांना अडवून बळजबरीने त्यांच्याकडील मोबाइल काढून घेण्याच्या घटनांची पोलीस ठाण्यांमध्ये नाेंद आहे.

मोबाइल चोरीला गेल्यानंतर आर्थिक नुकसान होते. त्याचबरोबरच मोबाइलमधील माहितीही चोरीला जाते. चोरी झालेल्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांकावरून शोध घेता येऊ शकतो; परंतु तंत्रज्ञानाचा गैरवापर करत मोबाइल चोरणारे आयएमईआय क्रमांक नष्ट करतात. आयएमईआय क्रमांक नष्ट करून ते मोबाइल पुन्हा वापरात आणले जातात. काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी अशा एका टोळीला गजाआड केले होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हद्दीतून २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत एकूण २८ मोबाइल चोरीला गेल्याची नोंद आहे.

------------

संगमनेर शहरातील मोबाइल चोरीच्या घटना

२०१९ - १३

२०२० - १५

-------------

मोबाइल चोरीला गेल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या व्यक्तीची मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. मोबाइल व त्यातील सीमकार्ड गहाळ झाल्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास अनेकदा लागत नाही. मोबाइल चोरीला गेल्यानंतर नवीन मोबाइल घेण्यासाठी पुन्हा मोठा खर्च होतो.

-----------

star 1046

Web Title: Thieves and mobiles are stolen in crowded places