..तर महिला उद्योजिकाही घडतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:34+5:302021-01-14T04:17:34+5:30

श्रीगोंदा : वृद्धेश्वर मल्टिस्टेटच्या माध्यमातून महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जाचा योग्य विनियोग उद्योग व्यवसायासाठी केला, तर महिला सक्षमीकरण ...

..Then women entrepreneurs will also happen | ..तर महिला उद्योजिकाही घडतील

..तर महिला उद्योजिकाही घडतील

श्रीगोंदा : वृद्धेश्वर मल्टिस्टेटच्या माध्यमातून महिला बचत गटांना मिळणाऱ्या कर्जाचा योग्य विनियोग उद्योग व्यवसायासाठी केला, तर महिला सक्षमीकरण होऊन त्याही उद्योजिका म्हणून पुढे येतील, असे मत नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा शहरातील वृद्धेश्वर मल्टिस्टेटच्या चैतन्य महिला बचत गटाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त यशस्वी महिला उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी किसन आघाव होते. गौरी भोस म्हणाल्या, चैतन्य महिला बचत गटाला पतसंस्थांमार्फत तीन कोटींचे कर्ज वितरण वितरण केले, ही बाब अभिमानास्पद आहे. महिला उद्योजक रेखा डाके, शोभा घाटे यांनी चैतन्य महिला बचत गटाने कर्ज पुरवठा केल्याने व्यवसाय उभारता आला, असे मत व्यक्त केले.

वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांनी महिला बचत गटांना केलेल्या अर्थसाहाय्याची माहिती दिली. प्रदीप आठरे यांनी आभार मानले.

फोटो ओळी १३ श्रीगोंदा वृद्धेश्वर

श्रीगोंदा शहरातील वृद्धेश्वर मल्टिस्टेटच्या वतीने उद्योजक महिलांचा सन्मान करताना नगराध्यक्षा शुभांगी पोटे, गौरी भोस व इतर.

Web Title: ..Then women entrepreneurs will also happen