दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:26 IST2021-09-07T04:26:18+5:302021-09-07T04:26:18+5:30

अहमदनगर : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून (दि. १०) प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांना बाप्पाची ...

Ten-day Ganeshotsav starts from Friday | दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ

अहमदनगर : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून (दि. १०) प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून सार्वजनिक गणेश मंडळांना बाप्पाची स्थापना करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी देखावे सादर केले होणार नाहीत. महापालिकेने नोंदणीकृत गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी नगर जिल्ह्यात आजही सातशे ते आठशे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाच्या निर्बंधांचे सावट कायम राहणार आहे. गतवर्षी कोरोनाच्या नियमांमुळे सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सव साजरा करता आला नाही. यंदा कोरोना असला तरी लॉकडाऊनचे निर्बंध जवळपास पूर्णपणे शिथिल झालेले आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी नियमांचे पालन बंधनकारक आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने गावोगावी, तालुका आणि शहर पातळीवर बैठका घेऊन मंडळांना सूचना दिलेल्या आहेत.

कोरोनाचे सावट असले तरी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप टाकण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. सर्व नियमांचे पालन मंडळांनी करायचे आहे. नोंदणीकृत असलेल्या गणेश मंडळांना एक खिडकी योजनेंतर्गत महापालिकेत परवानगी दिली जाणार आहे. यंदा मात्र कोणत्याही प्रकारचे देखावे असणार नाहीत. तसेच विसर्जन मिरवणुकीलाही कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असाच प्रशासनाने सध्यातरी निर्णय घेतलेला आहे.

----------------

अशी आहे नियमावली

गणेशमूर्ती चार फुटांची असावी.

घरघुती मूर्ती २ फुटांची असावी.

गणेश मंडळांनी परवानगी घेणे बंधनकारक.

नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी.

मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे.

शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती असावी.

मंडप परिसरातील गर्दी टाळावी.

सांस्कृतिकऐवजी आरोग्यदायी उपक्रम राबवावेत.

आरती, भजन, कीर्तनासाठी गर्दी असू नये.

मंडपात निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंग असावे.

गर्दी टाळण्यासाठी दर्शन ऑनलाइन असावे.

------------

Web Title: Ten-day Ganeshotsav starts from Friday