टाकळी ढोकेश्वर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील वासुंदे चौकात सोमवारी सायंकाळी टेम्पो उलटला. या अपघातात चालकाला किरकोळ मार लागला आहे. हा ट्रक आळेफाट्याकडून नगरकडे जात होता. सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास टेम्पो (एमएच २० ईएल ३६५५) हा आळेफाट्यावरून नगरकडे जात असताना वासुंदे चौकात एल आकाराच्या वळणाचा अंदाज चालकाला न आल्याने टेम्पो उलटला. येथील वळण अत्यंत धोकादायक ठरत असून, ग्रामस्थांच्या जीविताला मोठा धोका आहे. या चौकात आतापर्यंत लहान मोठ्या १४४ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}