शिक्षकांना घरातही पडत नाही शाळेचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:57+5:302021-09-08T04:25:57+5:30

अहमदनगर : शिक्षक शाळेत आल्यानंतर आपले घर विसरतात. पण घरी गेल्यावर शाळा विसरत नाहीत. कोरोना लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वर्ग घेताना ...

Teachers don't forget school at home | शिक्षकांना घरातही पडत नाही शाळेचा विसर

शिक्षकांना घरातही पडत नाही शाळेचा विसर

अहमदनगर : शिक्षक शाळेत आल्यानंतर आपले घर विसरतात. पण घरी गेल्यावर शाळा विसरत नाहीत. कोरोना लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन वर्ग घेताना तर शिक्षकांचे घरच या शाळा झाल्या होत्या, अशी भावना न्यू कला महाविद्यालयाच्या प्रा. योगिता खेडकर यांनी केले. त्यामुळे शिक्षकांचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे, असेही त्यांनी सांगितले.

सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. थोर शिक्षणतज्ज्ञ, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस योगिता खेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सुमेध देशमुख, वसुश्री रायपेल्ली, पायल आरोळे यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना खेडेकर म्हणाल्या, मुलांसमोर प्राथमिक शाळेतील शिक्षक येतात. लहान वयातील वयाची कळी उमलत असते. त्या वयातील संस्कार घट्ट होतात. समर्थ शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी आत्मीयता आहे. गुरूकुल ते ऑनलाईन शिक्षण या शिक्षकांचा प्रवास आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षक ही सर्वांत मोठी सायकॉलॉजिकल टेस्ट आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्त्व व गरज ही समाजाला समजली. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा थोडाच आहे.

शालेय समितीचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष भा. ल. जोशी, सेक्रेटरी प्र. स. ओहोळ, कार्यकारिणी सदस्य स्वप्नील कुलकर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अभय महाजन यांनी केले. निवेदन मेढे यांनी केले. ईशस्तवन लिना बंगाळ यांनी सादर केले. परिचय वैशाली मगर यांनी करून दिला. बाबासाहेब वाव्हळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शंकर निंबाळकर, संदीप गायकवाड, सविता येवले, स्वाती मुळे, सुनीता पांडव, संगीता पारखे, सोनाली माकरे, तिलोत्तमा क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

----------

फोटो- ०७ समर्थ स्कूल

सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. योगिता खेडकर,श्रीपाद कुलकर्णी, भा. ल. जोशी, प्र. स. ओहोळ, स्वप्नील कुलकर्णी, मुख्याध्यापक अभय महाजन आदी.

Web Title: Teachers don't forget school at home