माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:39+5:302021-09-08T04:26:39+5:30

प्रथमत: विद्यालयाचे संस्थापक डॉ. शाम खरात व मुख्याध्यापिका जयश्री खरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ...

Teacher's Day festivities at Mount Sinai School | माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात

प्रथमत: विद्यालयाचे संस्थापक डॉ. शाम खरात व मुख्याध्यापिका जयश्री खरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री खरात यांनी ऑनलाईन, ऑफलाईन उपस्थित असणारे शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रारंभी केझिया सूर्यवंशी या विद्यार्थिनीने सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना केली. त्यानंतर विश्वास बनकर, गणेश आवारे, ऋतुजा म्हस्के, स्तुती खरात यांनी प्रत्यक्ष व कबीर बेरड, अनुज मडीवालर, तहरीन शेख, अनामत शेख, श्रेया मिश्रा, रिया मिश्रा, अरुण चव्हाण यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांबाबतचे आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रतिमा ठोंबरे यांनी केले, तर शेवटी नेहा केदारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षिका व निवडक विद्यार्थी उपस्थित होते.

-----------

फोटो - ०७माऊंट सिनाय

टाकळी काझी येथील माऊंट सिनाय स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: Teacher's Day festivities at Mount Sinai School