परिक्रमात स्वामी विवेकानंद, जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:27+5:302021-01-14T04:17:27+5:30

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलात प्राचार्य रमेश शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद ...

Swami Vivekananda celebrates Jijau Jayanti with enthusiasm | परिक्रमात स्वामी विवेकानंद, जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

परिक्रमात स्वामी विवेकानंद, जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

काष्टी : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलात प्राचार्य रमेश शिंदे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली. याप्रसंगी प्रा. सुजाता वीर, प्रा. सागर सानप यांची व्याख्याने झाली.

यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल पुंड, संकुल संचालक डॉ. विजय पाटील, प्राचार्य सुनील निर्मळ व प्राचार्य रमेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

परिक्रमाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाचपुते, विक्रमसिंह पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते. प्रा. मेघना रायकर यांनी प्रास्ताविक केले.

---------

भिंगान येथे व्याख्यान

श्रीगोंदा : तालुक्यातील भिंगान येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शिंदे परिवाराने राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवव्याख्याते अरविंद कापसे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी पत्रकारांचा सन्मान व आई-वडिलांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. प्रशांत गोरे, नानासााहेब कोथिंबीरे, मीनल भिंताडे, भारती इंगवले, दत्ताजी जगताप, भीमराव आनंदकर, प्रा. बोडखे, कारभारी बोरूडे आदी उपस्थित होते.

Web Title: Swami Vivekananda celebrates Jijau Jayanti with enthusiasm