ऊस तोडणी मजुराचे मुकादमाने केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:51+5:302020-12-25T04:16:51+5:30

चालू गाळप हंगामासाठी महेबूब मुलानी याने राजुरी येथील वसंत संपत जाधव ( ५०) यांच्याकडे काही मजुरांची मागणी केली. त्यानुसार ...

Sugarcane harvesting laborer abducted | ऊस तोडणी मजुराचे मुकादमाने केले अपहरण

ऊस तोडणी मजुराचे मुकादमाने केले अपहरण

चालू गाळप हंगामासाठी महेबूब मुलानी याने राजुरी येथील वसंत संपत जाधव ( ५०) यांच्याकडे काही मजुरांची मागणी केली. त्यानुसार जाधव यांनी खिर्डी (ता. श्रीरामपूर) येथील काही तोडणी मजुरांशी मुलानी याची भेट घालून दिली. मुलानी याने मजुरांना बारा हजार रुपयांची उचल दिली. मात्र, मजूर कामावर गेले नाहीत. त्यानंतर मुलानी याने २० डिसेंबर रोजी वसंत जाधव यांना घरी येऊन मारहाण करत बळजबरीने कारमध्ये बसवून नेले. जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव यांच्या मुलाला फोन करून त्यांच्या सोडवणुकीसाठी चार लाख रुपयांची मागणी केली.

अखेर फिर्यादी छाया जाधव यांनी श्रीरामपुरातील जिल्हा शेतमजूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला. युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे व कृष्णा बडाख यांनी मुलानीशी संपर्क साधला. मात्र, पैसे दिल्याशिवाय जाधव यांना सोडण्यास त्याने नकार दिला. त्यानंतर लोणी पोलीस ठाण्याशी संपर्क करून गुन्हा दाखल करण्यासाठी सुरुडे यांनी प्रयत्न केले. मुलानी हे जाधव यांना सोलापूर येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची मुक्तता झालेली नव्हती. लोणी पोलिसांनी सोलापूर पोलिसांशी संपर्क साधला होता.

......

Web Title: Sugarcane harvesting laborer abducted