शांतनू व गौरव भुकन यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:17+5:302021-02-23T04:33:17+5:30

शांतनू श्रुती संगीत निकेतनचा विशारद पूर्णचा विद्यार्थी असून त्याला डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी मार्गदर्शन केले आहे. -- फोटो- २२ ...

Success of Shantanu and Gaurav Bhukan | शांतनू व गौरव भुकन यांचे यश

शांतनू व गौरव भुकन यांचे यश

शांतनू श्रुती संगीत निकेतनचा विशारद पूर्णचा विद्यार्थी असून त्याला डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

--

फोटो- २२ शांतनू व गौरव

------------

निमगाव वाघात ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

अहमदनगर : आनंदऋषीजी नेत्रालय, मिशन इंडिया टीम, निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री. नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. दिलीप भालेराव, डॉ. विजय जाधव, जगताप, अनिल डोंगरे, डॉ. सजिदा शेख, सुमन जगताप, सावली भालेराव, साधना बडवे, एकनाथ जाधव, साहेबराव जाधव, बाबा खळदकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे आदी उपस्थित होते. गावातील नवनाथ मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या शिबिरात गावातील ग्रामस्थांसह ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

------------------

आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे

अहमदनगर : महाराष्ट्रातील दुर्बल घटकातील लोकांसाठी सर्व आर्थिक विकास महामंडळाने सन २००० ते २००९ या कालावधीत दिलेली सर्व कर्ज माफ करावे व केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी आर्थिक विकास महामंडळ कर्जदार मुक्ती कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन ओबीसी चळवळीचे नेते अ‍ॅड. भानुदास होले यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी यांना नुकतेच पाठविले आहे. महाराष्ट्र सरकारने सन २००० ते २००९ या कालावधीतील सर्व आर्थिक विकास महामंडळाचे अंदाजे ९०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा सन २००९ मध्ये केली होती. महाराष्ट्र सरकारने सर्व आर्थिक विकास महामंडळाचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते. असे असतानाही सध्या आर्थिक विकास महामंडळाची कर्जवसुली तहसीलदार यांच्यामार्फत सुरू आहे. कर्ज माफ न झाल्यास कृती समितीच्या वतीने सर्व कर्जदार आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Success of Shantanu and Gaurav Bhukan