विद्यार्थ्यांना मिळताहेत फोर्टीफाईड तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:50+5:302021-07-30T04:22:50+5:30
कोरोनामुळे सध्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप करण्यात येत असून संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथील जिल्हा परिषद ...

विद्यार्थ्यांना मिळताहेत फोर्टीफाईड तांदूळ
कोरोनामुळे सध्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप करण्यात येत असून संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बुधवारी पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. मात्र, या तांदळात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक तांदळाची भेसळ असल्याचे पालकांनी मुख्याध्यापक सुभाष रहाणे यांच्याकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या आहारातील व्हिटॅमिन बी- १२ आणि लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी सदरचा तांदूळ उपयुक्त आहे. फोर्टीफाईड तांदूळ हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असून त्यामुळे लोहाची कमतरता, अशक्तपणा आणि इतर महत्त्वपूर्ण सूक्ष्म घटकांची स्थिती सुधारते. केंद्र शासनाने १ एप्रिल २०२१ पासून शालेय पोषण आहार योजना तसेच आयसीडीएस योजनेमधून फोर्टीफाईड तांदूळ वितरित करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. त्यानुसार काही शाळांना असा वृद्धिंगत केलेला तांदूळ प्राप्त झाला आहे. शालेय पोषण आहाराचा तांदूळ केंद्र शासनाकडून वितरित होतो, असे महावीर यांनी सांगितले.