शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 23:57 IST

टाकळी ढोकेश्वर : टाकळीढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयातील दहावीमधील विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला.

टाकळी ढोकेश्वर : टाकळीढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयातील दहावीमधील विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला. मात्र निवडुंगेवाडीचे दोन युवक आल्याने हा प्रयत्न फसला.टाकळीढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयानजीक ही विद्यार्थिनी रहाते. ढोकेश्वर विद्यालयात ती दहावीत शिक्षण घेते. गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास घरापासून ढोकेश्वर विद्यालयाकडे निघाली असताना एका कारमधून चार तरूण आले. व तोंडे बांधून आलेले दोन तरूण खाली उतरले व त्यांनी त्या विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने ओढून बसविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या विद्यार्थिनीने ओरडा केल्यानंतर निवडुंगेवाडीकडून दोन तरूण मोटारसायकलवर विद्यालयाकडे रस्त्याने येत असल्याचे अपहरणकर्त्यांना दिसल्यावर ते त्या विद्यार्थिनीला सोडून देऊन फरार झाले. दरम्यान ते निवडुंगेवाडीच्या दोन तरूणांनाही काही प्रकार समजला नसल्याने तेही निघून गेले. मात्र या विद्यार्थिनीने घरी हा प्रकार सांगितल्यावर पोलिसांना माहिती देण्यात आली. सायंकाळी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांनी संबंधित मुलीकडे चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत त्या मुलीकडून पोलीस अधिक माहिती घेत होते. दरम्यान, या अपहरणाच्या प्रकारामुळे टाकळी ढोकेश्वर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. याप्रकरणाचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती. (वार्ताहर)