शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बी-बियाणे, खतामध्ये शेतकऱ्यांची लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताची टंचाई ...

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताची टंचाई आहे. तसेच त्याचा काळाबाजार आहे सुरू आहे. त्वरित हे नियोजन करून शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून द्यावे. ज्या शेतकऱ्याचे शेततळ्यातील अनुदान मागील दीड वर्षांपासून रखडले आहे ते मिळावे, नवीन ठिबकचे सुद्धा अनुदान मिळत नाही त्याबद्दल लवकरात लवकर मार्ग काढावा. युरिया सोबत कोणत्याही इतर खतांची सक्ती करू नये, जिल्ह्यात कांदाचाळीचे लक्षांक वाढवून देऊन मागेल त्याला कांदा चाळ योजना सुरू करावी. गोडाऊन समोर व दुकानासमोर खताचे दर फलक व शिल्लक साठा याचा फलक लावण्यात यावा, खतसाठा आल्यानंतर त्या विभागाचे कृषी सहाय्यक यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे. दुकानदार दोषी आढळल्यास दुकानदार व संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करावेत, फळबाग योजनेच्या इस्टिमेटसाठी खासगी ऐवजी शासनाकडून नियुक्त अभियंत्याने कार्यवाही करावी, शेती अवजारासाठी जे अनुदान दिले जाते त्यातही लकी ड्रॉ पद्धत शेतकऱ्यांना न कळणारी आहे ती बदलावी, या मागण्यांवर त्वरित विचार झाला नाही तर मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार, तसेच हभप अजय महाराज बारस्कर व राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, उपाध्यक्ष देविदास येवले, नगर तालुकाध्यक्ष भगवान भोगाडे, शेतकरी बाबासाहेब दारकुंडे, संजय साळवे, दत्तू वाळके, नंदू म्हस्के, चंदू म्हस्के, विकास गटकळ, भरत लवांडे, नितीन पवार, तेजस गाढवे, कार्याध्यक्ष मालोजी शिकारे, संजय बामदले, संजय जयसिंग, शामराव लोखंडे, सुरेश सुपेकर आदी उपस्थित होते.

-----------

फोटो आहे

०९प्रहार निवेदन

बी बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या बाबतचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले.