हॉटेलमधून पैसे चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:21 IST2021-04-01T04:21:42+5:302021-04-01T04:21:42+5:30

---------------- ६५ हजार रुपयांची गाय चोरली अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथून चोरट्यांनी ६५ हजार रुपये किमतीची जर्सी गाय चोरून ...

Stolen money from the hotel | हॉटेलमधून पैसे चोरले

हॉटेलमधून पैसे चोरले

----------------

६५ हजार रुपयांची गाय चोरली

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथून चोरट्यांनी ६५ हजार रुपये किमतीची जर्सी गाय चोरून नेली. ३० मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी गणेश दिनकर आढाव यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुभम गोरख पिंपळे (रा. पिंपरणे), विजय शांताराम माळी (रा. अंभोरे) व अनिकेत सुनील इंगळे (रा. जोर्वे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हेड काॅन्स्टेबल आहेर हे पुढील तपास करत आहेत.

------------

मोटारसायकल चोरली

अहमदनगर: कापूरवाडी येथे घरासमोरून चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली तसेच शेतातून एक स्टार्टर चोरून नेले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मायंबा रंगनाथ दुसुंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गंगावणे हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Stolen money from the hotel